उन्हाळ्याच्या सुरवातीलाच वर्धा नदी कोरडाईच्या मार्गावर.


 मागील उन्हाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यात ५० डिग्री तापमान नोंदवित देशात दुसरा क्रमांक


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२२ फेब्रुवारी २४ 

राजुरा/काढोली (बु.) : मागील पावसात चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. पावसाने वर्धा नदीच्या नजीकच्या गाव शिवारात पुराणे शिरकाव केला होता. तब्बल तीनदा पुराणे गावाच्या वेशीवर येऊन आपले बिराड मांडले होते. याने कित्तेक गाव वासियांचे तालुका, जिल्हा, नजीकच्या गावांशी संपर्क तुटले होते. सतत तीनदा आलेल्या पुराणे शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वस्वी नुकसान केले होते. पुरग्रस्थांना पुरापासून सावरण्या करीता चांगलीच मशक्कत करावी लागली होती. पुराणे ये-जा करणाऱ्या मार्गावर चिखलाने आपले साम्राज्य थाटले होते ज्याने वाहनाने वाहतूक करणाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागली होती.

    मागील आलेल्या पाण्याने व पुराणे क्षेत्रातील लोकांकडून आशा बाडगळी जात होती कि, ह्या वर्षी वर्धा नदीला पाणी पुरेसे असणार परंतु सद्यस्तिथी पाहता वर्धानदीचे पात्र अर्धे कोरडे झाले असल्याने वर्धा नदी लगतच्या गावातून कोरड्याची चिंता व्यक्त केली जात आहे. वर्धानदी काटाला लागून असणारे शेतकरी सदर नदीच्या पात्रातून आपल्या शेतीची तहान भागवत असल्याने अगोदर पुराणे सर्व शेत वाहून नेले आणि आत्ता कोरड्याने हातचा घास देखील जातो कि काय असा प्रश्न शेतकऱ्यांत पडला आहे.

    इतक्या झपाट्याने नदीच्या पात्रातील पाणी विलुप्त झाल्याने समोरील उन्हाळा कसा असेल याचा अंदाज बांधता येतो. मागील उन्हाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यात ५० डिग्री तापमान (50 degree temperature in Chandrapur district) नोंदवित देशात दुसरा क्रमांक पटकवत चंद्रपूर जिल्याने आपले नाव देशात सर्वात उष्ण क्षेत्र म्हणून प्रसिद्धी केले होते. मग ह्यावेळी देखील चंद्रपूर वासियांना ५० डिग्री तापमानाला सामोरे जावे लागेल कि काय ? असा प्रश्न चंद्रपूर वासियांना पडत असल्याने काहींनी आपल्या घरात आत्ताच कुलर, ए. सी. बसवत उष्णते पासून बचावा करीता उपाय योजना सुरु केली आहे. (kadholi) (rajura) (chandrapur) (mahawani) (wardha river)

  • सद्य होत असलेली उष्णता पाहता ह्या उन्हाळ्यात देखील मागील वर्षां इतकीच उष्णता चंद्रपूर जिल्ह्यात होऊ शकते आणि येत्या एप्रिल-मे महिन्यात वाढत्या उष्णतेने दारा बाहेर पडणे देखील अवघड होईल. -श्री. शैलेश चटके, शेतकरी, सरपंच कढोली (बु.)

To Top