गौ वंश मांस विक्रेत्यांवर राजुरा पोलिसांची धडक कारवाई !

 

हत्यारे व गौ मांस विक्री करीता वापरात येणारी वजन मापे असा एकुण 12,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त !

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१० फेब्रुवारी २४

राजुरा : शहरामध्ये काही वेक्ती स्वत:च्या आर्थिक नफ्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गौ वंशाची अवैधरित्या कत्तल करुन गौ वंश मांसाची विक्री करीत असल्याची बऱ्याच दिवसांपासुन लोकांमध्ये चर्चा सुरु होती. याकरीता पोलीस स्टेशन राजुऱ्याचे प्रभारी अधिकारी योगेश्वर पारधी (P. I. Yogeshwar Pardhi) यांनी अधिनस्थ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राजुरा शहरातील विविध भागात गोपनिय माहिती काढुन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर काल ९ फेब्रुवारी रोजी सकाळी 06.00 वाजताचे सुमारास पोलीस स्टेशन राजुऱ्याचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नियोजन करुन चुनाभट्टी वार्डातील अलफलाह मस्जिदचे पाठीमागे धाड टाकली असता तलावाच्या पाठीमागील भागात अहमद गणी कुरेशी (55) रा. चुनाभट्टी वार्ड राजुरा, जमील खलील कुरेशी (52) रा. इंदिरानगर राजुरा असे दोघे अंदाजे 90 कि.लो. वजनाचे गौ वंश कत्तल करतांना आढळून आले

त्यांच्या ताब्यातुन गौ वंश कत्तली करीता वापरण्यात येणारी हत्यारे व गौ मांस विक्री करीता वापरात येणारी वजन मापे असा एकुण 12,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच घटनास्थळी कत्तली करीता बांधुन ठेवण्यात आलेला एका जीवित गौवंशाची सुटका करुन सुरक्षेकरीता कोंडवाडयात ठेवण्यात आले. 

आरोपींनी केलेल्या कृत्याबाबत पोलीस स्टेशन राजुरा येथे कलम 5 (क), 9 (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित अधिनियम 2015 तसेच कलम 429, 34 भा.दं.वि. अशा विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे (S. I. Naresh Urakude), पांडुरंग हाके, सहा. पोलीस उपनिरीक्षक अरुण मेश्राम, पोलीस हवालदार कैलास आलाम (Constable Kailas Alam), पोलीस अंमलदार बंडु राठोड व संतोष पोले यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार कैलास आलाम हे करीत आहेत.  (Rajura police action against cattle meat sellers) (mahawani) (rajura Police)

To Top