बल्लारपुर पोलिस निरीक्षक आसिफरजा शेखची नियुक्ती होताच धडक कारवाई !

  

लाखों रुपयांची अवैध देशी दारू जप्त : आरोपींनी काढला पड.

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१० फेब्रुवारी २४ 

बल्लारपुर : जिल्ह्यात रेल्वे जंक्शन व ब्लाक गोल्ड सिटी म्हणून नाम ख्व्याती असणारे बल्हारपूर शहर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार आसिफराजा शेख यांनी काल लाखों रुपयांच्या अवैध दारूवर कारवाई केल्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्राकडून लाखोच्या किंमतीची अवैध देशी दारू एका वाहनातून जात असल्याची माहिती मिळताच आपल्या पथकासह चतुराईने सापळा रचून अवैध दारू वाहून नेत असलेल्या वाहनावर कन्नमवार्ड न्यू कॉलोनी (Kannamward New Colony) येथे कारवाई केल्याने शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेले आहे. 

प्रत्यक्ष कारवाई नवनियुक्त पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख (Asif raja Shaikh), एपीआय प्रवीण कडू, पीएसआय साठे, हवलदार रणविजय ठाकुर, विशिष्ट रंगारी व श्रीनिवास वाभीटकर यांनी केली. दिवसों-दिवस शहरात अवैध दारुसह अन्य अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले असून पोलिस प्रशासन सदर कारवाईसह इतर अवैध धंद्यावर कारवाई करतील काय ? या कडे बल्लारपूर वासियांचे लक्ष लागले आहे. (As soon as Ballarpur Police Inspector Asifarja Sheikh was appointed, the strike action) ( ballarpur ) (police) (mahawani)


To Top