सावित्रीबाईंचे विचार प्रत्येक स्त्री पुरुषानी जपावे -मोहनदास मेश्राम


महात्मा ज्योतिबा फुले समाज सुधारक मंडळ सोमनाथपूर ने केले सावित्रीबाई फुले जयंती चे आयोजन.

महावाणी - विरेंद्र पुणेकर

5 जानेवारी 24

राजुरा : स्थानिक सोमनाथपूर वार्डातील महात्मा ज्योतिबा फुले समाज सुधारक मंडळ ने सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था हे होते. तर प्रमुख अतिथी म्ह्णून मोहनदास मेश्राम, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, वज्रमाला  बतकमवार, माजी नगरसेविका तथा राजुरा तालुका महिला संघटिका नेफडो, शिक्षक मनोहर वाघमारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातिला सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बावीस विध्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यातील प्रथम क्रमांक अनोखी निखाडे, द्वितीय आरती निकोडे, तृतीय अक्षता जयपूरकर यांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले. तर सहभागी विध्यार्थीना महात्मा ज्योतिबा फुले समाज सुधारक मंडळाच्या वतीने भेटवस्तु देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी आदे यांनी केले. तर आभार सारिका शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संदीप आदे, देवदास निकोडे, सुनील मोहुर्ले, सचिन गुरुनुले, इंदुताई निकोडे मंदाताई निकोडे, शिला मोहुर्ले, अर्चना निकोडे आदिसह समाज बांधव बघीनी यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी महाप्रसाद वितरित करण्यात आला.

मोहनदास मेश्राम यांनी उपस्थितीताना मार्गदर्शन करताना म्हणाले,  सावित्रीबाईंनी अनेक हालअपेष्ठा सहन करून प्रतिकूल परिस्थिती मधे स्त्री शिक्षणाची धुरा सांभाळली. त्यामुळे आताच्या या अनुकूल वातावरणात आपल्या सर्वांनां त्यांचे विचार जोपासत आपले सामाजिक जबाबदारी व कर्तव्यांचे पालन करावे लागेल आणी सावित्रीबाईंचे विचाराना पुढे न्यावे लागेल. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांना संस्कारीत करून  सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक जबाबदारी पूर्ण करणारी सक्षम पिढी तयार करण्यासाठी सतत कार्यशील असावे लागेल. ( Every man and woman should keep Savitribai's thoughts ) ( mahawani ) ( rajura ) ( savitribai fule )

To Top