महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारामुळे बल्लारपुर शहरातील जनता त्रस्त

Mahawani


पिण्याच्या पाण्याच्या समस्या संधर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरनाला निवेदन

महावाणी - विरेंद्र पुणेकर
23 जानेवारी 2024

बल्लारपूर : पिण्याच्या पाण्याच्या समस्या संधर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Life Authority), बल्लारपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून 1) लोकांना अवाढव्य पाणी बिल पाठवल्या जात आहे 2) नव्याने टाकलेली मुख्य पाईप लाईन जागोजागी फुटलेली आहे, 3) घरांमध्ये लावलेल्या नवीन नळ कनेक्शनचे पाईप लाईनचे काम निरुपयोगी ठरत आहे, 4) पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा केला जात नाही, एक-दोन दिवसाच्या आड केवळ अर्धा तास नळाने पाणी सोडले जातत याने बल्लारपूर शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात सर्वात मोठी अडचण विद्यानगर वॉर्डाजवळील परिसरातील नागरिकांना होत आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या या सर्व समस्यांबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) यांना निवेदन देण्यात आले. या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टी (aap) बल्लारपूरच्या जनतेला सोबत घेऊन लवकरच आक्रमक भूमिका घेऊ असे आवाहन शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी केले आहे. (ravikumar puppalwar) यावेळी शहर प्रवक्ते आसिफ हुसेन शेख, सचिव ज्योतीताई बाबरे, गौतम रामटेके, संजय खोब्रागडे, पंकज झिलटे, सुनील इंगला, छायाताई वनकर, बल्लारपूर शहरातील समस्याग्रस्त नागरिक व आदी उपस्थित होते. (Asif Hussain Shaikh, Secretary Jyotitai Babre, Gautam Ramteke, Sanjay Khobragade, Pankaj Zhilte, Sunil Ingla) (ballarpur) (mahawani) 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top