राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावात शेतमालाला अच्छे दिन.
महावाणी -विरेंद्र पुणेकर
२९ जानेवारी २४
राजुरा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावात शेतमालाला अच्छे दिन आल्याचे दिसून येत असून या वर्षीच्या हंगामात आतापर्यंत येथे पार पडलेल्या लिलावात तुवर ९६०० तर सोयाबीनला ४२२० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. आज झालेल्या तुवर आणि सोयाबीन लिलावात शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेल्या भावापेक्षा अधिक दर मिळाल्याने शेतकरी अतिशय आनंदी असून शेतकर्यांच्या मालाला अधिक भाव मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा येथे विक्रीस आनून मिळणारा नफा कमावावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर यांनी केले आहे.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर, उपसभापती संजय पावडे, संचालक ऍड. अरूण धोटे, जगदीश बुटले, संतोष इंदुरवार, लहु बोंडे, विनोद झाडे, आशिष नलगे, सचिव मोनिका मेश्राम यासह सर्व संचालक, शेतकरी उपस्थित होते.