आजी - माजी पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड सैनिक प्रमुख मुख्य संविधानिक मागण्या घेत राज्यपालाला - महेंद्र पाटील यांचे पत्र

Mahawani


आजी माजी पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड सैनिक यांच्या विविध मांगण्या बाबत शेवठी आज पासून युवा स्वाभिमान पार्टी चे जळगाव जिल्हा अध्यक्ष व सर्व त्रस्त परिवार मैदानात. 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२६ जानेवारी २४
1. पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड सैनिक यांना कामगार कायद्या अंतर्गत किमान वेतन कायद्याप्रमाणे वेळेत कपात व पगार वाढ होणे बाबत. 8 तासा पेक्ष्या जास्त कर्तव्य केल्यास त्यांना ओवर टाईम मिळावा ईतर शासकीय निमशासकीय विभागा प्रमाणें त्याचप्रमाणे त्यांच्या वेतनात 25% वाढ करावी ]. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होमगार्ड सैनिकांना सातवा वेतननुसार RS. 990 रुपये दर प्रमाणे मानधन वेतन वाढवून देण्यात यावे. तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी होमगार्ड सैनिक यांना इतर शासकीय विभागा प्रमाणे 5 दिवसाचा आठवडा करा.

2. होमगार्ड सैनिकांना 365 दिवस काम मिळणे बाबत त्यात 270 दिवस काम, 20 दिवस किरकोळ रजा, 30 दिवस वार्षिक रजा, 45 दिवस मेडिकल रजा भरीव ( वेतन ) मिळणे बाबत.[ ईतर शासकीय निमशासकीय विभागा प्रमाणें ] तसेच भारतीय संविधान कलम 13 नुसार बॉम्बे होमगार्ड अॅक्ट 1947 मधील निष्काम सेवा' हे (मानसेवी व स्वयंसेवी परिभाषेतील संभ्रम निर्माण करणारे) ब्रीदवाक्य नष्ट करून 'नियमित सेवा' अथवा इतर अर्ध सैनिक बला प्रमाणे आदर्श ब्रीदवाक्य देवूनी बॉम्बे होमगार्ड अॅक्ट 1947 वे सुधारणा अथवा बदल करण्यात यावे. त्यांना इतर सुरक्षा बला प्रमाणे ड्रेस कोड असावा किंवा या पूर्वी चा लोगो असावा आणि सुधारित ड्रेस कोड द्यावा .{ भारत सरकार आदेश (अ) संख्या 01/11/66 दिनांक 17.12.1966 आणि 20.12.1967, (ब) आदेश संख्या-01/04/67 सी डी डी टी. 19.02.1968 तसेच केंद्र सरकारच्या उपसचिवांनी काढलेल्या दि. 17 जानेवारी 1984 चा आदेश चे अमलबजावणी करून होमगार्ड सैनिक यांना 365 दिवस नियमित करण्यात यावे.}

3. बॉम्बे होमगार्ड अधिनियम 1947 कलम 9 नुसार होमगार्ड सैनिकास त्यानुसार ईतर शासकीय निमशासकीय विभागा प्रमाणें ESIC (मेडीकल सुविधा ), PF, TA, DA ई. सोयी सेवा सुविधा देण्यात यावी . [ ज्या प्रमाणे ईतर शासकीय निमशासकीय विभागा प्रमाणे खाजगी क्षेत्रात सेवेत असतांना किंवा घरी असतांना त्यांच्या सहित परिवार सदस्य यांना ESIC योजेनेचा फायदा होतो त्याच प्रमाणे होमगार्ड सैनिक व त्यांच्या परिवाराला द्या. त्या साठी दरमहा वेतन मधून नियमा प्रमाणे रक्कम कपात केली तरी चालेल ] 

4. आजी - माजी पोलिस अधिकारीकर्मचारी यांच्या पूर्वी व्या मेडिक्लेम सुविधेमध्ये सुधार करून सर्व आजारांचा समावेश करा त्यामध्ये त्यांना छोट्यात छोट्या आजारापासून मोठ्यात मोठ्या आजारापर्यंत निवृत्त नंतरही लाभ भेटायला पाहिजे अशी सुविधा करा किंवा ESIC योजनेप्रमाणे सर्व आजार एक रुपया पासून लाखो रुपया पर्यंत सर्व आजाराची सुविधा उपलब्ध करा. प्रत्येक पोलिस वसाहतीमध्ये अतिशय तात्काळ सेवे साठी मल्टी-स्पेशालिस्ट हॉस्पिटल निर्माण करावे आजी-माजी पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड सैनिक यांना व त्यांच्या परिवाराला सर्व आजारांवर इतर शासकीय निमशासकीय प्रमाणे आज पावतो व निवृत्ती नंतरही हॉस्पिटल सुविधा मिळणे बाबत.

5. होमगार्ड सैनिकांचे निवृत्तीची वयोमर्यादा 58 वरून 60 करावी तसेच होमगार्ड सैनिकांची तीन वर्षे पुर्नः नोंदणी पद्धत बंद करावी. होमगार्ड सैनिंकासाठी राहण्यासाठी स्वतंत्र वसाहती निर्माण करावी किंवा पोलीस वसाहतीमध्ये त्यांना राहण्यासाठी स्थान मिळावे.

6. गैर - संविधानिक पद्धतीने आज पावतो विविध स्वरूपाच्या आंदोलनामध्ये व विविध कारणा ने कमी झालेले होमगार्ड सैनिकांना परत कामावर घ्यावे.

7. आजी-माजी पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड सैनिक यांना अटल पेन्शन योजना तात्काळ सुरू करणे.

8. आजी - माजी पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड सैनिक तपास कामी येणे-जाणे करताना निवृत्तीनंतर केस कामी येणे-जाणे करताना प्रवास (भाडे) भत्ता वाढ करून मिळावी . निवृत्त पोलिस होमगार्ड सैनिक यांना केस कामी येणे जाने करताना त्यांना टोल नाका मध्ये सूट मिळण्याचा शासन निर्णय तात्काळ

करून द्या.

9. आजी - माजी पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड सैनिक यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी एक राखीव जागा विधानपरिषद / राज्यसभा मध्ये तात्काळ मिळावी.

10. होमगार्ड सैनिकांसाठी किंवा त्यांच्या परिवारासाठी कर्ज व इतर सुविधे साठी सोसायटी निर्माण करण्यासाठी तात्काळ परवानगी द्यावे.

11. आजी-माजी पोलिस अधिकारी, कर्मचारी होमगार्ड सैनिक यांच्या पाल्यांना भरती मध्ये मिल्ट्री प्रमाणे इतर फोर्सेस प्रमाणे अनुकंप तत्व प्रणाली मध्ये 25% आरक्षित स्थान मिळावे. तसेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य मध्ये देखील 3 वर्षे सेवा देवू केलेले होमगार्ड सैनिकांना पोलीस विभाग, वन विभाग किंवा इतर शासकीय प्रशासकीय विभागात 50% आरक्षण सह भरती निवळ प्रक्रियेत वयात आणि उंचीत विशेष सवलत देवूनी सरळ भरती वा नेमणूक देण्यात यावी.

12. आजी - माजी पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड सैनिक यांना मिल्ट्री कॅन्टीन ईतर डिफेन्स विभागप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात सुविधा मिळावी.  या मागण्या घेत समोर विभागांना पत्र 

1. मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महा.राज्य. मुंबई,

2. मा. श्री. देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री, महा.राज्य. मुंबई, 

3. मा. श्री. अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महा.राज्य. मुंबई 4. मा. पोलीस महासंचालक, महा.राज्य, मुंबई

5. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, महा.राज्य मुंबई.

6. मा. आयुष प्रसाद साहेब, जिल्हाधिकारी साहेब, जळगाव

7. मा. श्री. राजकुमार साहेब, पोलिस अधीक्षक साहेब, कार्यालय जळगाव

18. मा.. आयुक्त साहेब महानगरपालिका, जळगाव

9. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

10. मा. पोलीस निरीक्षक साहेब, जिल्हा पेठ, पोलीस स्टेशन जळगाव

प्रमुख मुख्य संविधानिक मागण्या ची प्रत सोबत जोडत पत्र रवाना करण्यात आले आहे. 

(aji - maji Police Officer, Staff, Home Guard Soldier Chief Chief Constitutional Demands Letter to Governor - Mahendra Patil) (mahawani) (jalgaon)


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top