जिल्ह्यात लवकरच मिळणार सामुहिक वन हक्क

Mahawani

 

(टाटा सामाजिक संस्थेचे संशोधन) : सामुहिक वनहक्का साठी  ६१० गावे प्रतीक्षेत


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१२ डिसेंबर २३

        चंद्रपूर : ०८ डिसेंबर २०२३, शुक्रवार रोजी मा.सा. कन्नमवार, जिल्हा परिषद चंद्रपुर येथे वनहक्क कायदाविषयी टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबईच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले. या कार्यशाळेत १०० सामुहिक वनहक्क ग्रामसभेसाठी केलेल्या कार्याचा अहवाल सादर करण्यात आला. कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर श्री. विवेक जॉन्सन, प्रकल्प अधिकारी, जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तथा सहायक जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री. मुरुगनाथम एम., टाटा सामाजिक संस्था प्रो. डॉ. गीतांजॉय साहू, , मुंबई, जिल्हा वनहक्क व्यवस्थापक स्नेहा, ददगाळ, प्रमुख पाहूणे उपस्थितीत होते.

    अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्क मान्य करणे ) अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ नुसार महाराष्ट्रात एकूण ८५३६ गावांना सामुहिक वन हक्क प्राप्त झाले असून यातील ४८४ गावे चंद्रपूर जिल्ह्यतील आहेत. तरीही केलेल्या अध्ययनात असे दिसून आले कि प्राप्त क्षेत्रात व ग्रामसभानां अपेक्षित वन क्षेत्रात तफावत दिसून येत आहे. तसेच वन हक्क कायदा २००६ येऊन १७ वर्ष उलटूनही जिल्हात ६१० ग्रामसभा वन हक्क झालेले नाहीत. प्राप्त होणे गरजेचे असतांना

    महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा हा सामुहिक वनहक्क क्षेत्राच्या मान्यतेतील आघाडीच्या जिल्ह्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रात एकूण ८५३६ ग्रामसभांना सामुहिक वनहक्क दावे प्राप्त झाले असून त्यापैकी ४८४ ग्रामसभा चंद्रपूर जिल्हयातील आहेत. त्यामुळे जवळपास जिल्हात लाख वननिवासी समुदाय वन संसाधनपासून वंचित आहेत. या संदर्भातील अहवाल या प्रसंगी प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी यांनी या अहवालाची दखल घेऊन प्रकरणे निकाली काढण्याबाबत योग्य कार्यवाही साठी संबधित अधिकारी व कर्मचारीना आदेश दिले.

    कार्यशाळेला नरेगा विभागाचे अधिकारी, जागृती संस्था, राधा ऑर्गनायझेशन, वसा, अंबुजा फॉउंडेशन, FES संस्था, रिवार्ड संस्था, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामसभा प्रतिनिधी, वनहक्क समन्वयक, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, TISS टीम चे प्रतिनिधी, उपस्थित होते. ( (Research by Tata Social Institute): 610 villages waiting for collective forest rights ) ( mahawani )( tata )

 

तालुका

सामुहिक वन हक्कासाठी पात्र ग्रामसभा

सामुहिक वन हक्क दावा प्राप्त ग्रामसभा

उर्वरित ग्रामसभा

चंद्रपूर

56

15

41

बल्लारपूर

29

12

17

कोरपना

24

13

11

भद्रावती

74

19

55

पोभुर्णा

56

3

53

जिवती

51

8

43

ब्रम्हपुरी

99

74

25

मुल

75

47

28

सावली

82

43

39

वरोरा

73

68

5

राजुरा

48

21

27

नागभीड

115

55

60

सिंदेवाही

98

50

48

चिमूर

145

52

93

गोंडपिपरी

69

4

65

एकूण

1094

484

610

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top