राजुरा उपजिल्हा रुग्णालय व CSTPS ठेकेदारी कामगारांचा प्रश्न पोहोचला कामगार आयुक्तांच्या दालनात

Mahawani
महावाणी - विरेंद्र पुणेकर
२७ डिसेंबर २३

            चंद्रपूर : ऍक्युरेक्स सर्विस कंपनी, औरंगाबाद तर्फे उपजिल्हा रुग्णालय, राजुरा जि. चंद्रपूर येथे कंत्राटी पद्धतीने आउट सोर्सिंग मध्ये क्लास ३ क्लास ४ वर्गातील एकूण ४८ विविध पदांवर असणाऱ्या कामगारांना या ठिकाणी रुजू करण्यात आले होते. या सर्व कामगार / कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले असून देखील या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून ५ महिन्यांचे वेतन कंत्राटदारानी अद्याप दिलेले नसल्याकारणाने या कर्मचाऱ्यांनी अखेर कंटाळून दिनांक- २१/१२/२०२३ रोजी राजुरा येथील आम आदमी पक्षाच्या  ( Aam Aadmi Party ) जनसंपर्क कार्यालयामध्ये येऊन  श्री. सुरजभाऊ ठाकरे (Mr. Surajbhau Thackeray), जिल्हाध्यक्ष कामगार संघटन तथा आप उपजिल्हाध्यक्ष, चंद्रपूर यांना आपली व्यथा सांगितली. सदर गंभीर बाब ऐकताच तात्काळ मा. कामगार जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे खडे बोल सुनावले व संबंधित प्रशासन दरबारी सदर प्रकरणाबाबत पत्रव्यवहार करत निवेदनामध्ये तात्काळ कामगारांचे पाच महिन्यांचे थकीत वेतन देण्यास मागणी केली. 

        यावर आज दिनांक- २७/१२/२०२३ ला सहायक कामगार आयुक्त (Assistant Labor Commissioner) यांच्या दालनामध्ये सदर विषयाला घेऊन झालेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे याकरिता आपल्या स्तरावर पावलं उचलले व सदर कर्मचाऱ्यांना १० तारखेपर्यंत वेतन न मिळाल्यास दिनांक- ११ जानेवारी २०२४ रोजी कंत्राट आयुक्त (Commissioner of Contracts) यांच्या दालनामध्ये हजर करून कार्यवाही करण्यात येईल असा विश्वास यावेळेस आयुक्तांनी मा. कामगार जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांना दिला.

         दिनांक- २०/१२/२०२३ पासून CSTPS प्रशासन विरोधात पाईप कन्व्हेअर बेल्ट (Pipe Conveyor Belt) मधील प्रकल्पग्रस्त कामगारांचे २६ दिवस नियमित काम मिळावे याकरिता सुरू असलेल्या साखळी उपोषणाची सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दखल घेत कामगारांना २६ दिवस नियमितपणे काम मिळावे याची अंमलबजावणी करण्याकरिता भाग पाडू असे देखील आज आयुक्तांच्या दालनात  कामगारांचा समक्ष सांगितले. ( aam admi party ) ( chandrapur ) ( rajura ) ( suraj thakre )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top