२३ डिसेंबर २३
चंद्रपूर : राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत. सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क, ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे.
ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. दादाभाऊ केदारे ( Dadabhau Kedare ) यांच्या निदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपूर कडून राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्य ग्राहक जनजागृती मेळाव्याचे आयोजन दि. २४ डिसेंबर दु. २:०० वा शासकीय विश्राम गृह ( VIP ) गेस्ट हाऊस, चांदा क्लब जवळ, चंद्रपूर येथे ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. संतोषभाऊ पारखी ( Santoshbhau parkhi ) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आला आहे.
ग्राहक जनजागृती मेळाव्यात ग्राहकांच्या हक्क, अधिकार व त्यांच्या सोयी सुविधेसंदर्भातील माहिती बाबत अवगत करण्यात येणार असून सदर मेळाव्यात ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समिती, चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी मा. प. जिल्हा उपाध्यक्ष श्री. विरेंद्र पुणेकर ( Veerendra Punekar ), जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. संजयकुमार शिंदे, जिल्हा संघटक मा. श्री. दीपक नन्हेट - जिल्हा सचिव मा. श्री. मुन्ना ईलटम, जिल्हा संपर्कप्रमुख मा. श्री. कमलेश शुक्ला, जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. अरविंद धिमान, मीडिया ( प्रसिद्धी ) प्रमुख मा. श्री. धम्मशिल शेंडे, कायदेशीर सल्लागार मा. श्री. ऍड. रवी धवन, जिल्हा सदस्य मा. श्री.अविनाश ऊके, जिल्हा सदस्य मा. राजू रायपुरे, नागभीड तालुका प्रमुख मा. श्री.गिरीश नवघरे, सर्व सदस्य व ग्राहक उपस्थित राहणार आहेत. ( mahawani ) ( chandrapur ) ( Consumer (Consumer) Protection Committee, Chandrapur )