स्व.गोदरू पाटील जुमनाके हे विकासाची दृष्टी असलेले धाडसी व निर्भिड व्यक्तिमत्त्वहोते -माजी आमदार सुदर्शन निमकर
२१ डिसेंबर २३
जिवती : 18 डिसे. रोजी गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था, जिवती येथे स्व. गोदरू पाटील जुमनाके तृतीय स्मृती दिनानिमित्त अर्धकृती पुतळ्याचे अनावरण व समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला. स्व.गोदरू पाटील हे जीवती तालुक्याच्या विकासासाठी सतत धडपडणारे धाडसी व निर्भिड व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी राजकीय वारसा नसतांना स्वत: व्यक्तिमत्त्व घडवित समाजाच्या उत्थानासाठी अविरत कार्य केले. त्यांनी कधीच जातीपातीचे व सुडबुध्दीचे राजकारण केले नाही. त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने जिवती तालुका निर्माण झाला. तसेच तालुक्यातील सिंचना करीता तलाव, रोडगुडा येथील बंजारा समाजाचे शक्तिपीठा करीता जागा मिळऊन देण्यास खुप मोठे योगदान आहे. खरं तर पाटील हे निस्वार्थ, प्रामाणिक व विश्वासु नेते होते. जिवती तालुक्याचा विकास हा कोकणा सारखा झाला पाहिजे असे स्वप्न पाहणारे नेते होते. तरुण वयापासूनच गोदरु पाटील हे समाजकार्यात स्वतःला झोकून देणारे युगप्रवर्तक नेते होते. गोदरू पाटलांनी जिवती या दुर्गम तालुक्यातील दाऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाला संघटित करून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अविरत कार्य केले. स्व. गोदरूजी पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी गजानन पाटील जुमनाके, पत्नी श्रीमती सतलूबाई जुमनाके व कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहू असे आश्वस्त केले. मरावे परी कीर्ती रूपे उरावे या म्हणप्रमाणे असा नेता जिवती तालुक्यात होणे हे दुरापास्त आहे, असे विचार माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष युवक काँग्रेस युवा नेते करण पुगलीया तर प्रमुख पाहुणे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय सचिव श्याम सिंग मरकाम, जिवती नगराध्यक्ष सौ.कविता आडे, कामगार नेते वसंत मांढरे, प्रमुख अतिथी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष आरजू सीडाम, हरीशजी उईके, बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, सामाजिक कार्यकर्ते आबीद अली, माजी जि.प. माजी सदस्य शिवचंद्र काळे, संचालक निशिकांत सोनकांबळे, प्राचार्य. संभाजी वारकड, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाणे, नगरसेविका श्रीमती सतलुबाई गोदरु पाटील जुमनाके, गोंडवाना संस्थेचे अध्यक्ष गजानन जुमनाके, सचिव बापूराव मडावी, विमाशीचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, प्रा.डॉ.प्रकाश वट्टी, प्रा.लक्ष्मण मंगाम, भीमराव पा. मडावी, प्रदिप बोबडे सह मान्यवर तथा हजारोच्या संख्येने समाज बांधव व जनसमुदाय तथा पाटलांचे हितचिंतक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन डॉ. प्रकाश वट्टी संपादित ग्रंथाचे "अखंड सेवाव्रती गोदरु पाटील जुमनाके" यांच्या कार्याला उजाळा देणा-या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पांडुरंग सावंत तर आभार संकेत कुळमथे यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी, माजी सभापती भिमराव मेश्राम, भीमराव पा.जुमनाके प्रा. नरसिंग लिंबोरे, सौ. शुभांगी जुमनाके, गजानन जुमनाके, विजय गोविंद वाघमारे, देमगुंडे, लिंगोराव सोयाम, डॉ. प्रकाश वट्टी, हनुमंत कुंभरे, ममताजी जाधव, जमालुदीन शेख, महेबुब भाई शेख, शेख व मारु पाटील नैताम यांनी परिश्रम घेतले. ( self Unveiling of Godru Patil's half-length statue on Jumnak 3rd Commemoration Day ) ( mahawani ) ( jivti ) ( rajura )