ई.व्ही.एम हटवा देश वाचवा स्वाक्षरी मोहिम #EVM



महावाणी - विरेंद्र पुणेकर
१४ डिसेंबर २३

        बल्लारपूर : नुकतेच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा देशभरात ई.व्ही.एम बाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. याचे पडसाद बल्लारपूर ( Ballarpur ) शहरातही बघायला मिळत आहे. आम आदमी पक्षाने शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात शहरातील नवीन बस स्थानक जवळ 12 डिसेंबर पासून ई.व्ही.एम ( EVM ) विरोधात स्वाक्षरी मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेत आज 174 लोकांनी ई.व्ही.एम विरोधात स्वाक्षरी करून आपला सहभाग नोंदविला. या मोहिमेच्या दरम्यान ई.व्ही.एम मशीनच्या विश्वासार्हतेबद्दल जनतेने देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला. 

        या मोहिमेसोबतच पक्षाने सदस्यता अभियान देखील राबविले ज्यामध्ये आज 21 लोकांनी पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. ई.व्ही.एम बद्दल बोलतांना शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार (Ravikumar Puppalwar) यांनी सांगितले भारतीय जनता पक्ष ( BJP ) पैशाचा व सत्तेचा दुरुपयोग करून  ई.व्ही.एम मध्ये फेरफार करून ठिकठिकाणी सत्ता हस्तगत करत आहे. जे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. म्हणून "ईव्हीएम हटाओ देश बचाओ" ( "Remove EVM Save the Country" ) मोहिमेअंतर्गत जनतेची स्वाक्षरी असलेले निवेदन राष्ट्रपती व निवडणूक आयोग यांना पाठविले जाणार आहे. यानंतरही जर निवडणूकीत ई.व्ही.एम मशीन बंद केले गेले नाही तर त्याविरोधात जनहित याचिका देखील दाखील केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. या मोहिमेत जिल्हा संघठन मंत्री नागेश्वर गंडलेवार, शहर उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योतीताई बाबरे, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख,  महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. ( District Organization Minister Nageshwar Gandlewar, City Vice President Afzal Ali, Secretary Jyotitai Babre, Spokesperson Asif Hussain Shaikh, Women Vice President Salma Siddiqui ) ( mahawani ) ( President ) ( Election Commission india )

To Top