बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांच्या सन्मानासाठी सोडले गाव

Mahawani

 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२३ डिसेंबर २३

        गडचिरोली : गावाच्या प्रमुख चौकात ग्रामपंचायतीचा ठराव पारित करून लावलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामफलक काढल्याने दुखावलेल्या बौद्ध बांधवानी गुरूवार, 21 डिसेंबर रोजी कुटुंबासह गाव सोडल्याची धक्कादायक घटना चामोर्शी तालुक्यातील नवरगाव Navargaon ) येथे घडली. या घटनेने मोठा संताप व्यक्त होत असून दोषीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. नवरगाव येथे दीड वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या फलकावरुन वाद सुरु आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना 20 डिसेंबरला 200 पोलिस दलाच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीने नामफलक काढले. यावरुन प्रशासनाप्रती मोठी नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतीच्या सहमतीनेच फलक लावले गेले होते मग ते का काढले, असा प्रश्न उपस्थित केला. 

        ज्या गावात घटनेच्या शिल्पकाराचे नामफलक लावण्याचा अधिकार नाही, त्या गावात न्याय मिळणार का ज्या गावात न्याय मिळत नाही अस्या गावात राहायचे कशाला, असे म्हणत 40 कुटुंबातील 200 लोकांनी आपल्या गरजेच्या वस्तू सोबत घेत गुरुवारी सकाळी सोडले गाव. सायंकाळच्या सुमारास सर्व बैलबंडीवरुन गोविंदपूर नाल्याजवळ ठिय्या ठोकला असून उद्या जिल्हा मुख्यालयाकळे प्रस्तान करणार असल्याची माहिती, नवरगावच्या उपसरपंच करिष्मा कनिकर Deputy Sarpanch Karisma Kanikar ) यांनी  माध्यमाला दिली आहे.

यापूर्वी सुध्दा गाव सोडण्याचा घेतला होता निर्णय

        नवरगाव येथील बौद्ध बांधवांनी या पूर्वीसुद्धा गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने गाव सोडण्याचा निर्णय रद्द केला. मात्र गेल्या महिन्याभरापासून गावात ताण-तणावाचे वातावराण निर्माण झाले असल्याने. अप्रत्यक्ष सुरु झालेला त्रास आणि डॉ. बाबासाहेबांचे नामफलक हटविल्याने अखेर कुटुंबासह गाव सोडले. 

Buddhist brothers left the village to honor Babasaheb ) ( gadchiroli ) ( mahawani ) 

To Top