महिला अपंग एकता शक्ती संघटना बल्लारपूर तर्फे जागतिक अपंग दिन साजरा.महावाणी - विरेंद्र पुणेकर 
०३ डिसेंबर २३

        बल्लारपूर : जागतिक अपंग दिनानिमित्त 3 डिसेंबर दिव्यांग दिन ( disabled day )  बल्लारपूर शहरात महिला अपंग एकता शक्ती संघटनेतर्फे ( Mahila Apang Ekta Shakti Association ) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील सर्व दिव्यांग बांधवांनी बल्लारपूर शहरातील नगर परिषद चौकात एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि जोरदार घोषणाबाजी करून दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

      यावेळी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संस्था प्रमुखांचा सहभाग होता. अध्यक्षा नंदनी पंधळे, उपाध्यक्षा सरला गेडाम, सचिव नाझिमा कुरेशी, सहसचिव कांचन भोरे, कोषाध्यक्ष रूपा राठोड, सहकोषाध्यक्ष संगीता गायकवाड, सदस्य प्रिया त्रिपाठी, रंजना निमगडे, गिरजा जानेकर, सविता नेवारे आदी उपस्थित होते. ( Ballarpur ) ( mahawani )

To Top