शिवाजी महाविद्यालय आजोजित राज्यस्तरीय लोक नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Mahawani


ग्रामगीता महाविद्यालय चिमूर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२६ डिसेंबर 23

            राजुरा : येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटना राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय समूह  लोकनृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला. राज्यभरातून 25 चमूनी या स्पर्धेत सहभागी नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार एड. संजय धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डी.बी.भोंगळे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा चे सचिव अविनाश जाधव, शिवाजी महाविद्यालय राजुरा चे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, उप प्राचार्य डॉ. राजेश खेरानि, माजी विद्यार्थी संघटना चे अध्यक्ष अविनाश दोरखंडे, सचिव बादल बेले, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, संतोष डेरकर, परीक्षक मृणालिनी खाडीलकर, सुमाणा बॅनर्जी,  निकिता झाडे,सरपंच, ग्रा पं, रामपूर, संदीप खोके, आशिष करमनकर ,सुयोग साळवे, छोटू सोमलकर, सुरेश रागीट, मनोज तेलीवार, भारत  भोयर, बबलू चव्हाण, आशिष करमरकर, आसिफ सय्यद, राजेश गोखरे, रवि बुटले , प्रा.संतोष देठे, प्रा.संजय ढवस , प्रा.विकास बल्की, प्रा.डी सी. माहा, प्रा. लोकेंद्र कुळमेथे आदींची उपस्थीत होती.  राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार 11 हजार रोख माजी आमदार अड.संजय धोटे यांचे कडून आणि स्मृतिचिन्ह ग्रामगीता कॉलेज चिमूर,द्वितीय आठ हजार रोख संदीप खोके यांचे कडून गोविदराव मुनघाटे कॉलेज कुरखेडा,तृतीय पुरस्कार सरपंच निकिता झाडे यांचे कडून पाच हजार रोख आणि स्मृतिचिन्ह आदर्श कॉलेज वडसा,प्रोत्साहन  पुरस्कार माजी नगराध्यक्ष रमेश नळे,आशिष करमनकर, संतोष देरकर यांचे कडून तीन हजार रोख आणि स्मृतिचिन्ह चिंतामणी कॉलेज पोंभूना, सरदार पटेल कॉलेज, चंद्रपूर, केवलाराम हरडे कॉलेज, चामोर्शी यांनी पटकाविले. प्रास्ताविक बादल बेले यांनी केले संचालन प्रा.जया मेहेर यांनी केले आभार सुरेश रागीट यांनी मानले. या प्रसंगी राज्यभरातून शेकडो स्पर्धक सहभागी झाले एका पेक्षा एक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. ( Spontaneous response to state level folk dance competition ) ( mahawani ) ( rajura ) ( shiwaji mahavidhyalay )

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top