सीमे लगतच्या भागात कोंबळा बाझार जोमात


भारी बोरगाव वासीयांकडून कोंबळा बाझार प्रतिबंध घालण्याची मांग.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२० डिसेंबर २३

        राजुरा : कोंबळा बाजाराचे आयोजन करून सट्टेबाजीचा जुगार खेळण्यावर शासनाने बंदी घातली आहे. कोंबळा बाजाराला जुगार गुन्हा म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे. मात्र असे असतानाही ग्रामीण भागात कोंबळा बाजार थाटून लोक जुगार खेळत आहेत. जिल्ह्याच्या सिमे लगतच्या भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील भरी-बोरगाव येथे रोजचा कोंबळा बाजार व जुगारामुळे गावकरी तसेच शालेय विद्यार्थी व तरुण जुगाराला बळी जात आहे. 

        अशा स्थितीत गावातील सामाजिक वातावरण ताणले असून या सारख्या कोंबळा बाजारावर तात्काळ आळा घालण्याची मागणी ग्रामस्थांनी पो. प्रशासनाला केली आहे. स्थानिक पोलिसांना सदर कोंबळा बाजाराची बऱ्यापैकी माहिती असतांनाहि कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही याचे स्थानिकात आश्चर्य वेक्त केले जात आहे. भारी-बोरगाव येथे सुरू असलेल्या कोंबळाबाजाराला आळा घालण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. 

        गावातील मोकळ्या रानात आणि कोरड्या शेतात कोंबड्यांच्या पायात धार-धार चाकू किंवा धारदार शस्त्रे (काती) गुंपून कोंबड्यांची मारामारी करवत कोंबड्यांवर पैज लावली जातात. अशा मारामारीत अनेकदा एक कोंबळामरतो आणि दुसरा गंभीर जखमी होतो. या काळात लोकांना पैज लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आता या प्रकारच्या कोंबळा मार्केटमध्ये लाखो रुपयांच्या बोल्या लावल्या जात आहेत. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर तेलंगणा राज्यातूनही जुगारू लोक येतात आणि जमतात. या बहाण्याने झेंडीमुंडी, पत्त्यांचा जुगार व इतर बेकायदेशीर प्रकार घडत असून त्याचा सामाजिक वातावरणावर मोठा परिणाम होत आहे.  ( Kombla Bazaar jiwati ) ( Mahawani ) ( lakkadkot ) ( bhari borgaon )

To Top