काँग्रेस अनुसूचित जाती विभाग राजुरा तालुकाध्यक्षपदी श्री. कोमल निरंजन फुसाटे यांची निवड.


आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२९ नोव्हेंबर २३

        राजुरा : राजुरा तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या तालुकाध्यक्ष पदावर रामपूर येथील युवा काँग्रेस कार्यकर्ते श्री. कोमल निरंजन फुसाटे ( Komal Niranjan Fusate ) यांची नियुक्ती करण्यात आली असून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून अभिनंदन केले आहे. त्यांची ही निवड चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल देविदास खापर्डे यांच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी सार्थ करून दाखविण्यासाठी पुर्ण ताकदीने काम करणार असून समाज बांधवांना काँग्रेस पक्षाशी जोडून पक्ष बळकट करण्यासाठी  तसेच पक्षाचे ध्येय धोरणे सर्व सामन्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने ग्रामीण व शहरी भागात परिश्रम घेणार असल्याची प्रतिक्रिया अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे यांनी व्यक्त केली. 

        या प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्या या निवडीबद्दल माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवडकर, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर वाढई, अभिजीत धोटे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, कार्याध्यक्ष ऐजाज अहमद, पंढरी चन्ने, ॲड. चंद्रशेखर चांदेकर, सुरेश पावडे, धनराज चिंचोलकर, आकाश माऊलीकर, चेतन जयपुरकर आदींनी अभिनंदन केले आहे. ( mahawani ) ( congress ) ( rajura ) ( subhash dhote )

To Top