राजुरा काँग्रेसच्या वतीने श्रीमती इंदिरा गांधींना अभिवादन.


उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रुग्णांना फळवाटप. 


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१९ नोव्हेंबर २३

        राजुरा : तालुका काँग्रेस कमीटी राजुरा च्या वतीने इंदिरा जीनींग राजुरा येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयर्न लेडी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थित सर्व मान्यवरांनीही अभिवादन केले. यानंतर उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे स्व. इंदिरा गांधींना विनम्र अभिवादन केले आणि राजुरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप करण्यात आले. 

          या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, महिला काँग्रेस अध्यक्षा निर्मला कुळमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, पतसंस्थेचे संचालक साईनाथ बतकमवार, महादेव ब्राम्हणे, सविता आकनुरवार, ज्योशी मॅडम, सागर लोहे, संदेश करमरकर, योगेश बोढे, इंदिरा जिनींग अॅन्ड प्रेसिंग चे उपाध्यक्ष अरूण लांडे, राजुरा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, लक्ष्मण एकरे, कविता उपरे, पुनम गिरसावळे, सुमित्रा कुचनकर, कुरुमदास पावडे, रामचंद्र शेंडे, भाष्कर चौधरी, यु. काँ. महासचिव निरंजन मंडल, श्रिकांत चिट्टलवार यासह कांग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. ( Fruit distribution to patients at Upazila Hospital Rajura on behalf of Rajura Congress ) ( mahawani ) ( Rajura ) ( congress ) ( subhash dhote )

To Top