अखेर विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेबांचे शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी केले स्वागत.

Mahawani


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१९ ऑक्टोबर २३

        चंद्रपुर : आज महाकाली माता महोत्सवाच्या उदघाटन समारंभाकरीता मोरवा विमानतळ ( morva vimantal ) येथे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर ( rahul narwekar ) साहेबांचे आगमन झाले असता मा. अध्यक्ष साहेबांचे स्वागत करण्यासाठी मा. आमदार साहेबांनी यादी निचित केले होती, ज्याचे पोलीस प्रशासन काटेकोर पालन करत होते. यादी व्यतिरिक्त अध्यक्ष नार्वेकर साहेबांची भेट व स्वागत करण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. 

        ज्यात विद्यमान महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पक्षातील चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी हे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचा स्वागतासाठी गेले असता मा. आमदार साहेबांच्या सूचीत शिवसेना ( शिंदे ) चंद्रपूर तालुका प्रमुख मा. संतोषजी पारखी यांचे नाव समाविष्ट नसल्याने त्यांना अध्यक्ष साहेबांचे स्वागत करण्यास मज्जाव करण्यात आला. जेव्हा की, तालुका प्रमुख पारखी यांनी मा. नार्वेकर साहेबांचे विशेष कार्य अधिकारी श्री. मकरंदजी पाटील ( makrand patil ) साहेबांची परवानगी घेतली होती. तरी देखील त्यांना मा. अध्यक्ष साहेब यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला, परंतु संतोष  पारखी ( santosh parkhi )  यांन्ही आपली मुठ घट्ट बांधली होती की, आज अध्यक्ष साहेबांचे स्वागत केल्याशिवाय इथून जाणार नाही. या हट्टापोटी त्यांनी आज एका शिवसैनिकाची खरी जिद्द दाखून देईलच म्हणत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुलजी नार्वेकर साहेब मोरवा विमानतळावरून चंद्रपूरच्या दिशेने जातांना ताफा तोडत वाहनात पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. 

        संतोष पारखी माध्यमाशी बोलतांना सांगत होते कि विधानसभा अध्यक हे कुठल्या एका पक्षाशी सीमित नसून ते विधानसभा सभागृहाचे अध्यक्ष आहे. आणि त्यांना भेटण्यास व स्वागताकरिता कुणाच्या परवानगीची आम्हाला आवश्यकता नाही. तसेच महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब असताना देखील प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी ज्याप्रमाणे मुजोरी करुन शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला न जुमानता आम्ही शिंदे साहेबांचे हात बळकट करुन चंद्रपुरात श्री. माता महाकालीच्या आशिर्वादाने जोमाने कामाला लागुन शिवसेना पक्ष संघटना झपाट्याने वाढवुन दाखवु. ( chandrapur ) ( mahawani ) ( santosh parkhi )


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top