शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षपदी बंडू हजारे, नितीन मते यांची निवड

Mahawani



महावाणी - विरेंद्र पुणेकर 
१३ ऑक्टोबर २३

            चंद्रपूर: बंडू हजारे यांच्या नियुक्तीचा चंद्रपूर शहरामध्ये त्यांच्या समर्थकांचा जल्लोष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे ( eknath shinde ) यांच्या आदेशाने तसेच शिवसेना सचिव संजय मोरे, ( sanjay more ) पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव ( kiran pandav ) यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नितीन मत्ते  ( nitin matte ) सह बंडू हजारे ( bandu hajare ) यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बंडू हजारे यांच्याकडे राजुरा, चिमूर, ब्रह्मपुरी ( rajura, chimur, bramhapuri ) या तिन विधानसभा क्षेत्राचा प्रभार देण्यात आला आहे. 

        शिवसेना शिंदे( shivsena shinde )  गटाने चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने काही नियुक्त्या करण्यात आल्या आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते, बंडू हजारे यांनी दिली आहे. यात गंगाधर बडूरे ( gangadahr badure ) यांची जिल्हा सपंर्क प्रमुख पदी निवड केली असून त्यांच्याकडे बल्लारपूर ब्रम्हपूरी चिमूर ( ballarpur, bramhapuri, chimur ) या तिन विधानसभा हे कार्यक्षेत्र दिले आहे तसेच दत्तात्रय पाईवार ( Dattatraya Paiwar ) यांची देखील जिल्हा सपंर्क प्रमुख पदी निवड करीत त्यांच्याकडे वरोरा, चंद्रपूर, राजूरा ( warora, chandrapur, rajura ) या तिन विधानसभा कार्यक्षेत्र देण्यात आले आहे.

     चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नितीन केशव मत्ते ( nitin keshaw matte ) यांच्याकडे वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर ( warora, chandrapur, ballarpur ) या तिन विधानसभा क्षेत्राची जवाबदारी दिली आहे तसेच नुकतेच मणसेला जय महाराष्ट्र ठोकून मोठ्या संखेने सहकार्या सह आलेले भरत गुप्ता ( Bharat Gupta Chandrapur City Metropolitan Chief ) यांना चंद्रपूर शहर महानगर प्रमुख नियुक्त करण्यात आले आहे. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top