हे राम केव्हा होईल रस्त्याचे काम ?


महावाणी - विरेंद्र पुनेकर
२१ ऑक्टोबर २३

        राजुरा: कढोली (बु) हडस्ती मार्गाचे काम मागील २ वर्षांपासून तसेच रखडून बसले आहे. सदर मार्गाने होत असलेल्या सिमेंट काँक्रेट मार्गाचे काम कासव गतीने होत असून मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहन चालक व पायदळ जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

        मार्गाचे काम सुरु होऊन ३ वर्ष पूर्ण होत आहे तरी हि मार्गाचे काम पूर्ण का होत नाही हा प्रश्न कढोली व मार्गाने ये-जा करणाऱ्या लगतच्या गावातून सातत्याने विचारला जात आहे. मार्गाचे १ वर्षा अगोदर एका बाजूचे अर्धवट सिमेंट काँक्रेट रोडचे काम करण्यात आले होते परंतु मागील २ वर्षांपासून सदर मार्गाचे काम बंद असल्याने त्याच रोड मध्ये असलेल्या दुसऱ्या बाजूच्या मार्गात अवजळ वाहने जाऊन खड्ड्याचे साम्राज झाले असल्याने मार्गाने ये-जा करणे मोठे अवघड झाले आहे. 

        पावसात पडलेल्या खड्यात पाणी साचून ये-जा करणाऱ्या नागरिकाचे कित्तेकदा शरीर चिखलाने माकले आहे तसेच मार्गाने जाताना अर्धवट झालेल्या सिमेंट रोड मधून बाहेर आलेले १ फुटाचे लोखंडी रॉड वाहतूक कर्त्याला घातक ठरले आहे. नुकतेच काही महिन्या आधी खड्ड्यात वाहन घसरून रोड मधून निगालेल्या रॉडने वाहन चालकाला जबर दुखापत झाली होती सुदैवाने त्याचा जीव वाचला असे घटनास्थळी असणारे वाहतूक कर्त्यातून बोलले जात होते. तरी प्रशासनाचे सदर मार्गाकडे दुर्लक्ष होत असून काही सिवसात खड्ड्यामुळे कढोली हडस्ती मार्ग बंद होण्याच्या शक्यता नाकारू शकत नाही. कढोली व आजू-बाजूच्या गावातून मार्गाची अवस्ता पाहून संताप वेक्त केला जात आहे. 

To Top