तात्काळ ई-ऑटो पासिंग करा अन्यथा आरटीओ दंडाची रक्कम व कर्जाचे हप्ते भरा!


शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांना इशारा!  

    


महावाणी - विरेंद्र पुणेकर
१5 सप्टेंबर २३

    चंद्रपुर :- येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या खुशिया लोकसंचालित केंद्रामार्फत महिला बचत गटांना ई-ऑटो वाटप करुन  एक वर्षाचा कालावधी होवून देखील ई-ऑटोची पासिंग करून न दिल्याने आरटीओ कार्यवाहीचा दंड व थकीत कर्जाचे  हप्ते व्यवस्थापकांना भरावे लागेल असा इशारा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी दिला. 

    संबंधित विभागाकडून महिला बचत गटांना ई-ऑटो वाटप करून जवळपास एक वर्ष पूर्ण झाले असून देखील आजपर्यंत एकही ई-ऑटो पासिंग करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे आरटीओ विभागाने महिला बचत गटाच्या ई-ऑटोवर कारवाई करणे सुरू केले असता तात्पुरती कार्यवाही न करण्याबाबत विनंती केली आहे. 

    त्याकरीता सर्व ई-ऑटो महिला बचत गटांनी दोन ते तीन महिण्यापासून बंद ठेवले आहे. याबाबत खुशिया लोकसंचालित केंद्र यांना माहिती दिली होती. तरी देखील कुठलीही पासिंगची कारवाई सुरू केलेली नाही. त्यामुळे सर्व ऑटो बंद असल्याने महिला बचत गटाला कर्ज फेडणे कठीण झाले असून तात्काळ पासिंग करून देण्यात यावी.

    अन्यथा आरटीओच्या कारवाईचा दंडाची रक्कम व कर्जाचे हप्ते चंद्रपुर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांनी भरण्याचा इशारा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी दिला, यावेळी वैद्यकीय जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, उपतालुका प्रमुख बंडू पहानपाटे, तालुका संघटक संजयकुमार शिंदे, उपतालुका प्रमुख सुरेश खापर्डे, उपतालुका प्रमुख अविनाश ऊके व राजू रायपुरे यांची उपस्थित होते.  ( Do e-auto passing immediately otherwise pay RTO penalty amount and loan installments! ) ( Mahawani )

To Top