कालच्या अपघाता मागे चाळण झालेला सास्ती राजुरा मार्ग

महावाणी - विरेंद्र पुणेकर
१४ ऑगस्ट २३

    काल दिनांक. १३ ऑगस्ट रोजी झालेल्या दुर्दयवी अपघाता मागे चाळण झालेला सास्ती- राजुरा मार्गच मागील काही काळा पासुन सदर मार्गाची दुर्दयवी अवस्ता असल्याने मार्गाने वाहतुक करताना नागरिकांना आपला जीव हातात घेऊन प्रवास करावे लागत आहे.

नागरीक आपले वाहन कसे बसे सांभाळत ह्या मार्गाने प्रवास करतात त्यात नुकतेच पावसात झालेले रोडचे खोद कामाने अगोदर असलेले थोडे फार डांबर या खोदकामात काळून मार्गावर पूर्णता रवाळी पसरण्यात आली होती परंतु भर पावसात खोदकाम आणि त्या वरती मोठ-मोठी रवाळी रोडवर पसारल्याने मागील पेक्षा पुन्हा मोठे खड्डे पडले असून नागरिकांना सदर मार्गाने याता-यात करणे अश्यक झाले आहे. यात दुचाकी, हलके वाहन इत्यादींन मार्गाने वाहतूक करताना खड्डे चुकवत वाहतूक करावी लागत आहे. 

परंतु याच बरोबर मोठे वजनी वाहन या मार्गाने याता-यात करत असतांना भर धाव वेगात जाता असतात वजनी वाहन चालकांना ते खड्डे भासत देखील नाही. सदर मार्गाने ते सुसाठ धावतात परंतु लहान हलके वाहन मार्गाने वाहतूक करताना कासवगतीने खड्डे चुकवत जात असतांना मागून भर वेगात येत असलेल्या मोठ्या जळ वाहना कळे लक्ष करावे की समोरील चाळण झालेला मार्ग कळे हा मोठा प्रश्न आहे. काल रात्तो घडलेला भीषण अपघात याची ग्वाई  देते की सदर मार्गाने प्रवास करेन  हे स्वताचा जीव धोक्यात घालणे आहे. या मार्गाने २४ तास मोठे जळ वाहन भर वेगात धावत असतात मग ते रात्रो असो की दिवस मोठे जळ वाहन धावतांना दिसतातच तसेच सदर मार्गा विना दुसरा पर्यायी मार्ग देखील नाही काही केल्या सदर मार्गात येत असलेल्या गावकर्यांना, कर्मचार्यांना, कीरकोळ विक्रेत्यांना, याच मार्गाने नाइलाजाने प्रवास करावा लागतो परंतु कालच्या भीषण अपघाताने नागरिक हादरून गेले आहे. आज हेच प्रश्न घेऊन वे.को.ली महाव्यवस्थापक कार्यालय, धोपटला कॉलोनी येथे  रस्ता रोको आंदोलन करीत वे.को.ली मुर्दाबाद चे नारे लावण्यात आले व सदर मार्गावरून मोठ्या जळ वाहनाची वाहतूक बंध करण्याची मागणी करण्यात आली. 

To Top