२० जुलैला मुंबईत मोर्चा पावसाळी अधिवेशन मुंबई मंत्रालयावर गायरान धारक शासकीय महसूल जमिनीवरील अतिक्रमण धारकाचा मोर्चा
श्री. कुशल मेश्राम यांची माहिती Khushal Meshram
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या उपस्थित महाराष्ट्रातील गायरान अतिक्रमण जमिनीचे पट्टे हे संबंधितांच्या नावावर करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंजाब राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. या याचिकेवर निर्णया देताना संपूर्ण देशात दहा हजार हेक्टरहून अधिक जमीन अतिक्रमाखाली असल्याचे निदर्शनात आले त्यानुसार राज्यातील सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात आली आहे नियमानुसार २० ते ३० वर्षापासून वास्तव्याला असणाऱ्यांचे अतिक्रमण नियमाकुल केले जाते. अनेक शासन निर्णय व न्यायालयाचे आदेश याबाबत आहेत मात्र न्यायालयाचा आधार घेऊन नागरिकांच्या डोक्यावरील छत काढले जात आहे.
या आपल्या देशातील प्रत्येक भूमिहीन,दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, बहुजन,भटके विमुक्त आणि वंचित समूहातील परिवार स्वतःच्या मालकी हकाच्या जमिनीचा मालक झालं पाहिजे असे विचार वंचित बहुजन आघाडीचे नेते महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.