कौतुक चिमुकल्या कवियेत्री चे

महावाणी - विरेंद्र पुणेकर
२९ जुलै २०२३

        कुमारी. पूर्वी विलास मडावी (१३) इयता 7 वी रा. आयता ता. आर्णी जिल्हा. यवतमाळ येथिल कष्टकरी कुटुंबातील मुलगी पुर्वीच्या कुटुंबात चार झन आहेत पूर्वी ,तीची लहान बहिन व तीचे आई वाडिल पूर्वीचे वडिल विलास मडावी व आई सौ मंदा मडावी  दोन्ही शेतात कष्ट करतात .मोलमजुरी करून संसाराचा गाड़ा चालावतात तसेच पूर्वीची आई गावाच्या सरपंचा आहेत घरची परस्थिती मोठ्या हलाकीची कसे बसे उदरनिर्वाह चालतो यात पूर्वी ने कमालच करून दाखवली चिमुकल्या वयात  तिने आई वरती एक कविता केली होती जी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाली होती त्या कवितेची वावाई संपूर्ण महाराष्ट्राने केली सर्वांचे बोलणे होते की ह्या वयात वयाच्या १३ व्या वर्षी इतकी उत्कृष्ट कविता करणे नवलाचे आहे.  आनी पुर्वीची वावायकी वा कौतुक व्हायलाच पाहिजे कारण आज आपल्या आजू बाजुने पाहिले तर कविता, निबंध ,कथा , करनारे मूल पहायला मिळत नाही तरी पूर्विच्या मनात कविता ,निबंध आनी कथा करण्याची आवड आहे.
पूर्वीच्या यशा माघे तिची आई आयता गावाची सरपंच्या  व तिचे वाडिल यांचा मोठा हात आहे. मनूनच मानसशास्त्र सांगतं, की पालकांनी वेळोवेळी दिलेल्या शाबासकीतून, त्यांनी केलेल्या कौतुकातून मुलांमधील आत्मसन्मानाची, सुरक्षिततेची आणि कर्तबगारीची जाणीव वाढीस लागते. आनी त्यांचा बौद्धिक ,मानसिक व शारीरिक विकास होतो .पूर्वी ने मागील काही काळात सहभाग घेतलेल्या स्पर्धा जसे सामान्य ज्ञान स्प्रर्धेत पहिले पारितोषिक, महादीप स्पर्धेत तालुका स्तरावरून निवड व जिल्हास्तरीय अंतिम फेरित २ गुणाने विमानवारिला वंचित राहिली तसेच जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेत दुसरा क्रमांक याच सोबत असंख्य स्पर्धेत तिने या चिमुकल्या वयात भाग घेत पारितोषिक पटकावले आहे आनी पुर्विन तिच्या आई च्या जीवनावर स्वरचित एक सुंदरसा लेख तयार केला .पूर्विला तिची आई सौ मंदा मडावी सर्व स्पर्धेत सहभाग घेन्यासाठी प्रोत्साहित करत राहतात. यामूळे आज पूर्वी यशाच्या वाटचाली कड़े आहे आनी पूर्वी भविष्यात खुप यश प्राप्त करेल तीचे आनी तीच्या आई वाडिलाचे नाव मोठे करेल . पूर्वी आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहे

To Top