गरजू कुटुंबाला मदतीचा हात अतिशय विकट परिस्तिथि

Mahawani

बल्लारपूर | शहरातील डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड येथे एक परिवार अतिशय हलाखीचे जीवन जगत आहे. लॉकडाउन काळात त्या गरजू अत्यंत हलाखीचे जीवन व्यतीत करणाऱ्या कुटुंबापर्यंत कुठलीच मदत पोहचलेली नाही. अशातच आम आदमी पार्टीचे बल्लारपूर शहर सहसंयोजक रवी पुप्पलवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत आसिफ हुसेन शेख बल्लारपूर शहर सचिव, विरेंद्र पुणेकर होते.


सदर परिवार अतिशय दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे. परिवारात वयस्कर जोडपे असून त्यांना एक मतिमंद मुलगा आहे. कुटुंबापर्यंत प्रशासनाचीही कोणतीही मदत पोहचली नाही. शिवाय या कुटुंबाला मदत करून त्यांच्या डोक्यावर योग्य छत उभारून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे रवी पूप्पलवार यांनी सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top