Rajura Municipal Election | राजुरात भाजपसमोर ‘महासंघर्ष’ अरुण धोटे पुन्हा मैदानात

Mahawani
0
Arun Dhote, BJP flag, and photograph from the Nagar Vikas Aghadi meeting

भाजपचा नगराध्यक्ष उमेदवार अद्याप अनिश्चित; अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि आयात नेतृत्वाच्या राजकारणावरून कार्यकर्ते असंतुष्ट

Rajura Municipal Election | राजुरा | नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीने शहराचा राजकीय तापमान अचानक वाढवले आहे. माजी नगराध्यक्ष श्री. अरुण धोटे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर होताच शहरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. सलग तीन कार्यकाळ नगराध्यक्ष राहून शहराच्या मूलभूत विकासाला दिशा देणारे धोटे यांच्या पुनरागमनाने जनतेत उत्साह तर आहेच, पण भाजपच्या स्थानिक नेतृत्वात मात्र अस्वस्थतेची लाट पसरली आहे. गेल्या काळात शहरातील आयात लोकप्रतिनिधींनी केलेल्या कारभारावर व्यापक नाराजी आहे, आणि स्थानिक निवडणुका लांबणीवर गेल्याने प्रशासनाच्या हातात सत्ता आता निवडणुकीचा बिगुल वाजताच पुन्हा जनतेसमोर उत्तरदायित्वाची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राजुराच्या राजकीय पटावर नव्या समीकरणांनी रंग घेतला आहे.

Rajura Municipal Election

राजुरा शहरातील राजकीय वातावरणात सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे, नगरविकास आघाडीची स्थापना. या आघाडीच्या छत्राखाली शेतकरी संघटना, काँग्रेस, रिपब्लिकन नेते आणि प्रबुद्ध नागरी चळवळी एकत्र आले असून, या सर्व घटकांनी एकत्र लढण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या आघाडीच्या मागे माजी आमदार ऍड. वामनराव चटप आणि श्री. सुभाष धोटे या दोन अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन असल्याने हा संघर्ष आता केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर राजुराच्या भविष्याचा निर्णायक संग्राम ठरणार आहे.

Rajura Municipal Election

मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज संकुल सुपर मार्केट, राजुरा येथे झालेल्या बैठकीत आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या बैठकीत सर्व घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा, विभागनिहाय उमेदवार निवड प्रक्रिया, आणि निवडणूक समन्वय समितीची रचना यावर सखोल चर्चा व वरिष्ठ नेत्यांची भाषणे झाली. “ही निवडणूक केवळ सत्तेचा नाही, तर शहराच्या भवितव्याचा प्रश्न आहे,” असा ठाम सूर या बैठकीत उमटला.

Rajura Municipal Election

भ्रष्टाचारमुक्त नगरपरिषद हीच लढ्याची दिशा

आघाडीच्या नेतृत्वाने स्पष्ट केले की, राजुरा शहराच्या प्रश्नांकडे गेल्या काही वर्षांत दुर्लक्ष झाले आहे. पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडलेली, रस्ते खोदकामा, घनकचरा व्यवस्थापन, आणि करप्रणाली या सर्वांवर आघाडीने बोट ठेवले. जनतेच्या हिताला प्राधान्य, प्रशासनिक उत्तरदायित्व आणि भ्रष्टाचारमुक्त नगरपरिषद हा आमच्या लढ्याचा गाभा असल्याचे बैठकीत मांडण्यात आले, ही घोषणा केवळ घोषणाबाजी नव्हे, तर नगरविकास आघाडीचा घोषणापत्राचा पाया ठरवण्यात येणार आहे. राजुरा शहराच्या विकासासाठी पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकसहभाग आवश्यक असल्याचे नेतृत्वाने अधोरेखित केले.

Rajura Municipal Election

भाजपच्या गोटात गोंधळ, अंतर्गत संघर्ष उफाळला

या नव्या समीकरणामुळे भाजपच्या गोटात मात्र चांगलीच धांदल उडाली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असून, भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, बाहेरून आणलेल्या एका तथाकथित नेत्याने स्वतःच्या पत्नीला व नातेवाईकाला नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवण्याचा डाव आखला आहे, आणि हाच मुद्दा भाजपच्या अंतर्गत तणावाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मूळ संघनिष्ठ कार्यकर्त्यांना या “कुटुंबवादाच्या प्रयोगामुळे” नाराजी असून, काही इच्छुक व बासिंग बांधून उभे असलेले उमेदवार स्वतंत्र लढतीचा विचार करत आहेत. राजुरात भाजपने गेल्या काळात लोकाभिमुख कामकाजाऐवजी ‘प्रतिमा राजकारण’ आणि ‘आयात नेतृत्व’ यावर भर दिला. प्रशासनाशी साटेलोटे, कंपन्या/ठेकेदारांशी हितसंबंध, आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष या सर्व गोष्टींनी जनतेचा विश्वास खालावला आहे.

Rajura Municipal Election

भाजपचा आत्मघातकी आत्मविश्वास

भाजपचे स्थानिक नेते “राजुरा आमचा गड आहे” असा दावा करत असले तरी वास्तव वेगळे आहे. गेल्या निवडणुकीपासून मतदारसंघात झालेली जनतेची मानसिक बदलाची प्रक्रिया भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. नगरविकास आघाडीने मतविभाजन रोखण्यात यश मिळवले, तर भाजपची गणिते पूर्णपणे उलटी होऊ शकतात. राजुरातील मतदारांनी गेल्या काही वर्षांत विकासाऐवजी ‘स्वार्थी राजकारण’ आणि ‘गटबाजी’चा अनुभव घेतला आहे. स्थानिक विश्लेषकांचे म्हणणे आहे की “या वेळी भाजपसाठी ही निवडणूक आत्मपरीक्षणाची ठरणार आहे. जनता आता घोषणांवर नव्हे, तर कामगिरीवर मतदान करेल.”

Rajura Municipal Election

राजकारणात बदलाची हवा

राजुरातील राजकीय समीकरणे जलद गतीने बदलत आहेत. नगरविकास आघाडीने शेतकरी, कामगार, युवक, मागासवर्गीय, आणि नागरी समाज या सर्व घटकांना एकत्र आणले आहे. या ऐक्यामुळे निवडणुकीत विचाराधारित संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत जातीय आणि प्रादेशिक गटबाजीचा परिणाम स्पष्ट दिसला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत “सत्ता नव्हे, विकास” हा मुद्दा केंद्रस्थानी येणार आहे.

Rajura Municipal Election

अरुण धोटे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गट आधीच संघटनात्मक दृष्ट्या मजबूत आहे. त्यांचा जनसंपर्क, अनुभव, आणि प्रशासकीय समज या गोष्टींमुळे त्यांना नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे दिसते. दुसरीकडे, भाजपकडे कार्यकर्त्यांची फौज असूनही दिशा आणि नेतृत्वाची कमतरता स्पष्ट दिसते. भाजपने राजुरात सत्तेचा उपयोग लोकसेवेसाठी केला नाही, तर सत्तासुखासाठी, असा भाव सर्वसामान्य नागरिकांत निर्माण झाला आहे.

Rajura Municipal Election

राजकारण नव्हे, उत्तरदायित्वाचा संग्राम

राजुरातील आगामी निवडणूक ही केवळ पक्षांची चुरस नव्हे, तर उत्तरदायित्वाचा जनमतसंग्राम आहे. गेल्या काळात शहराच्या विकासात झालेला स्थगितपणा, अपुरे नियोजन, आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी जनतेचा संयम संपला आहे. भाजपने केलेले विकासाचे दावे आता फोल ठरत आहेत. राजुरा नगरपरिषदेची ही निवडणूक राज्याच्या राजकीय नकाशावर लहान असली, तरी तिचा अर्थ मोठा आहे. ती स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या अहंकाराला, पक्षनिष्ठेपेक्षा जननिष्ठा श्रेष्ठ असल्याचा धडा शिकवू शकते. भाजपच्या अंतर्गत गोंधळाने आणि आयात नेतृत्वाच्या अतिरेकी हस्तक्षेपाने राजुराचा कार्यकर्ता असंतुष्ट झाला आहे. याउलट, आघाडीने एकत्रित आणि धोरणात्मक लढाईची तयारी दाखवली आहे. ही निवडणूक जनतेला ठरवायची आहे — विकासाचे राजकारण हवे की प्रचाराचे? भाजपसाठी ही निवडणूक “सत्तेची परीक्षा” असेल; तर राजुराच्या जनतेसाठी “सत्याची कसोटी.”


Who is contesting for the Rajura Municipal Chairperson post in 2025?
Former three-time chairman Arun Dhote has announced his candidacy for the Rajura Municipal Council Chairperson post.
What political alliance has formed against the BJP in Rajura?
A “Nagar Vikas Aghadi” has been formed, uniting the Congress, Farmers’ Union, and Republican movements to challenge BJP’s dominance.
Why is the Rajura election considered crucial this year?
It is seen as a public verdict on the BJP’s governance, corruption allegations, and stalled development during the past term.
What issues dominate the Rajura Municipal Election 2025 campaign?
Key issues include water supply, road infrastructure, waste management, corruption-free governance, and overall city development.


#RajuraElection2025 #ArunDhote #BJP #RajuraPolitics #MunicipalPolls #MaharashtraPolitics #RajuraNagarParishad #RajuraNews #PoliticalBattle #RajuraVote #RajuraUpdates #RajuraMunicipalCouncil #RajuraCity #OppositionUnity #RajuraVoters #RajuraDevelopment #RajuraLeadership #RajuraCampaign #RajuraElections #RajuraAwakening #RajuraPublicVoice #RajuraDemocracy #RajuraChange #RajuraAgainstCorruption #RajuraPeople #RajuraCongress #RajuraFarmersUnion #RajuraRepublicanMovement #RajuraCivicIssues #RajuraTransparency #RajuraAccountability #RajuraPolitics2025 #RajuraHeadlines #RajuraMovement #RajuraBattle #RajuraCitizens #RajuraUprising #RajuraAgenda #RajuraCampaignTrail #RajuraReform #RajuraVoice #RajuraMedia #RajuraVoteForChange #RajuraLocalNews #RajuraChandrapur #RajuraUnity #RajuraChallenge #RajuraRevolution #RajuraPollBattle #RajuraMahawani #SubashDhote #WamanraoChatap #DeepakChatap

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top