राजुरा भाजपमध्ये दीर्घकाळापासून वाढत असलेल्या अंतर्गत कलहाला कंटाळून माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांचा शिवसेनेत प्रवेश
Rajendra Dohe | राजुरा | काल शहरातील स्थानिक राजकारणात महत्त्वाचा टप्पा गाठणारी घटना घडली. भाजपा पक्षात गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून उसळत असलेल्या अंतर्गत गटबाजी, सूडशीत युद्ध आणि नेतृत्वातील असहजपणाचा परिणाम अखेर प्रत्यक्षात आला. दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी माजी नगरसेवक श्री. राजेंद्र डोहे यांनी भाजपाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश केवळ पक्षबदल नव्हे, तर आयात उमेदवारामुळे भाजपच्या स्थानिक संघटनात्मक अपयशाची जाहीर कबुली मानली जात आहे. कारण, डोहे हे राजकीय कामात सातत्य, संघटनशीलता आणि व्यक्तिगत स्वच्छ प्रतिमेमुळे ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळखले जात होते. असा कार्यकर्ता गमावणे हे भाजपसाठी स्थानिक तसेच जिल्हास्तरावर गंभीर संकेत देणारे आहे.
Rajendra Dohe
पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, राजुरा शहरातील शिवसेना पक्षकार्यालयात पार पडला. विदर्भ दैऱ्यावर असलेले माजी आमदार आणि शिवसेना निरीक्षक श्री. सहसराम कोरोटे यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा प्रमुख श्री. बंडू हजारे, निरीक्षक श्री. हर्बल सिंदे, नुकतेच नेमलेले विधानसभा संघटक श्री. संदीप वैरागडे, तालुका प्रमुख खुशाल सूर्यवंशी आणि शहर प्रमुख अभय ठाकूर व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत डोहे यांनी अधिकृत प्रवेशाची घोषणा केली.
Rajendra Dohe
राजेंद्र डोहे यांचा प्रवेश हा शिंदे गटाच्या स्थानिक रणनीतीतील संगतवार पाऊल मानले जात आहे. कारण, राजुरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या कमरेत शक्ती आणण्याचे शिंदे गटाचे लक्ष्य आहे. राजकारणात जमिनीवरची पकड, वैयक्तिक विश्वासार्हता आणि मतदारांशी थेट संवाद असलेले कार्यकर्ते पक्षासाठी अमूल्य असतात. नेमका अशाच प्रकारचा कार्यकर्ता भाजपने आयात उमेदवाराच्या परिवारवादाने आणि आंतरिक गोंधळामुळे गमावला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते अगामी नगरपरिषद निवडुकीच्या पार्श्वभूमीवर ही हानी क्षुल्लक नसल्याचे बोलले जात असून शिवसेना पक्षाकडून दोहे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर होण्याचे दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Rajendra Dohe
स्थानिक स्वराज्य संशेच्या निवडणुकीला घेऊन गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये चाललेले भांडण, परस्परांविरोधातील तक्रारी, स्थानिक पातळीवर चालणारे कटकारस्थान आणि नेत्यांमधील तीव्र अविश्वास—या सर्वांचा परिणाम संघटनावर होताना दिसला. ‘चांगल्या माणसांचा पक्ष’ ही प्रतिमा बळकट करण्यापेक्षा स्वतःच्या लोकांना प्रथम स्थान देऊन वर्षोनुवर्षे पक्षाशी निष्ठा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान देणे, टीकाकारांना गप्प बसवणे आणि संघटनात्मक संयम गमावणे—ही राजुरा भाजपची अलीकडील शैली बनली असल्याची टीका कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे ऐकू येत होती. या वातावरणाचा सर्वाधिक तोटा झालेल्यांपैकी एक म्हणजे राजेंद्र डोहे.
Rajendra Dohe
डोहे यांच्या जाण्याने भाजपचे स्थानिक समीकरण मोठ्या प्रमाणात ढासळणार असल्याचे स्पष्ट आहे. कारण, डोहे हे राजकीय निर्णयांपेक्षा सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर काम करणारे, पक्षाच्या अंतर्गत संघर्षात कधीही गुंतले नाहीत असे मानले जायचे. अशा व्यक्तीला टिकवून ठेवण्याऐवजी, गटबाजीच्या नादात त्यांना बाजूला ढकलले गेले हे भाजपची उघड चुक मानली जात आहे. खास करून आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपा आक्रमक तयारीचा दावा करत असताना, स्वतःची संघटनात्मक ताकदच दुर्बल करणे ही रणनिती स्पष्टपणे उलटलेली दिसते.
Rajendra Dohe
शिवसेना (शिंदे गट) मात्र या प्रवेशा नंतर आणखी आत्मविश्वासात आली आहे. पार्टीने स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी शिस्तबद्ध, कामसू आणि जनतेशी सरळ संवाद साधणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यावर भर दिला आहे. राजेंद्र डोहे यांची निवड ही त्याच रणनीतीची पुष्टी आहे. कार्यक्रमात भाष्य करताना वरिष्ठ नेत्यांनीही स्पष्ट केले की, “जनतेशी प्रामाणिक राहणाऱ्यांना आम्ही नेहमीच सन्मान देतो; पक्षात त्यांचे योग्य स्थान सुनिश्चित करतो.”
Rajendra Dohe
या संपूर्ण घडामोडींमधून एक गोष्ट मात्र निर्विवादपणे स्पष्ट होते—राजुरा भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष आता उघडपणे फुटू लागला आहे, आणि त्याचे राजकीय दुष्परिणाम प्रत्यक्ष दिसू लागले आहेत. ‘कार्यकर्ते’ गमावण्याची किंमत भाजपला आगामी निवडणुकांमध्ये किती मोजावी लागणार, हे येणाऱ्या काही महिन्यांत स्पष्ट होईल. परंतु, आजची राजकीय परिस्थिती सांगते की, राजुरा विधानसभा क्षेत्रात शक्तिसंतुलन नव्याने आकार घेत आहे आणि त्याचे केंद्रबिंदू आता भाजप नसून शिंदे गट बनत चालला आहे.
Why did Rajendra Dohe leave the BJP?
Why is his entry into the Shinde Sena faction significant?
Who were the key leaders present during his induction?
How will this shift impact Rajura’s political landscape?
#RajendraDohe #ShindeSena #RajuraPolitics #BJPInternalRift #MaharashtraPolitics #ShivSena #EknathShinde #Vidarbha #RajuraNews #PoliticalShift #LocalBodyElections #RajuraBJP #BreakingNews #ChandrapurPolitics #SasaramKorote #BanduHajare #SandeepVairagade #RajuraUpdate #PoliticalCrisis #PartySwitch #GrassrootPolitics #PoliticalRealignment #RajuraElection2025 #BJPExodus #ShindeGroup #RajuraLeadership #RajuraDevelopments #RajuraMunicipalPolls #MaharashtraLocalElections #PoliticalEntry #ChandrapurDistrict #RajuraHeadlines #RajuraLive #ShivSenaShindeGroup #PoliticalTransition #RajuraTurningPoint #MaharashtraUpdates #RajuraLeaders #RajuraGroundReport #PoliticalAnalysis #RajuraCampaign #ElectionShift #RajuraFocus #RajuraBuzz #PoliticalNews #RajuraSpotlight #RajuraScenario #ChandrapurUpdates #RajuraBreaking #RajuraNews #VeerPunekarReport #MahawaniNews #BJPtoShivsena JugalDhote #SachinDohe
.png)

.png)