ठाकरे यांच्या हस्तक्षेपाने पोलीस प्रशासन गप्प
Rajura Ganesh Visarjan | राजुरा | चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहराने ७ सप्टेंबर रोजी झालेल्या गणेश विसर्जनात एक गंभीर आणि वादग्रस्त प्रसंग अनुभवला. गणेशोत्सव हा भक्तिभावाचा उत्सव मानला जातो, पण रविवारी या उत्सवाच्या आडून कायद्याची पायमल्ली झाली, आणि पोलिस प्रशासनाने मौन पत्करल्याने संपूर्ण जिल्ह्यात आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.
दहा वाजता DJ बंद, पण राजकीय हस्तक्षेपाने नियम मोडीत
राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर स्पष्ट नियम आहेत की लाउडस्पीकर, DJ वा डॉल्बी रात्री १० नंतर वाजवणे गैरकायदेशीर आहे. त्याच नियमांचा आधार घेत राजुरातील पोलीस प्रशासनाने विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान १० वाजता DJ बंद केला. पण हा निर्णय जास्त वेळ टिकला नाही. Rajura Ganesh Visarjan काँग्रेस नेते श्री. सुरज ठाकरे यांनी पुढाकार घेत “गणेश भक्तांचा आग्रह” या कारणास्तव DJ पुन्हा सुरु केला. केवळ सुरु केला नाही तर सार्वजनिकरीत्या आव्हान देत म्हटले की – “DJ १२ वाजेपर्यंत चालू राहणार, कुठलेही गुन्हे दाखल करायचे असतील तर माझ्यावर करा.
१२.३० पर्यंत धडकला डॉल्बी, पोलिस मात्र शांत
या घोषणेनंतर राजुरात DJ चे ठणाणारे सूर रात्री साडेबारा वाजेपर्यंत सुरूच राहिले. स्थानिक नागरिकांनी ध्वनी प्रदूषण व कायदा मोडल्याचे निदर्शनास आणून दिले तरीही पोलिसांनी कुठलाही हस्तक्षेप केला नाही. Rajura Ganesh Visarjan ना गुन्हा नोंदवला, ना DJ बंद करण्याची किमान औपचारिकता केली. म्हणजेच, कायदा अंमलात आणण्याचे काम ज्यांच्याकडे सोपवले आहे, तेच मौन साधून बसले.
हे कायदा नाही तर हुकूमशाही
हा प्रकार केवळ नियमांचा भंग नाही, तर कायद्याला राजकारण्यांच्या आदेशाखाली झुकवण्याचा उघड प्रयत्न आहे. Rajura Ganesh Visarjan एका राजकीय नेत्याने स्वतःला कायद्यापेक्षा वर मानून संपूर्ण प्रशासनाला डावलले, आणि पोलिसांनी त्याला विरोध करण्याचे धाडस केले नाही.
प्रश्न असा आहे की, हे लोकशाहीचे लक्षण आहे की राजकीय हुकूमशाहीचे? प्रशासनाने नियम एकासाठी आणि अपवाद दुसऱ्यासाठी ठेवायचे का? मग सामान्य नागरिकांनी कायद्याचे पालन करायचे का, हा स्वाभाविक प्रश्न आहे.
प्रशासनाची गप्पी – लोकांमध्ये संताप
घडलेला प्रकार राजुराच्या नागरिकांसाठी संतापजनक आहे. Rajura Ganesh Visarjan गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासन ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक आदेश देत आले आहेत. त्याच न्यायालयीन आदेशांच्या कचाट्यात सामान्य नागरिक, व्यापारी, छोटे कार्यक्रम आयोजक अडकतात. पण राजकीय दबाव आल्यावर तेच कायदे पायदळी तुडवले जातात.
प्रशासन गप्प राहून कुणाच्या दबावाखाली काम करतेय का, हा संशय बळावतोय.
प्रश्नच प्रश्न
- पोलिसांनी १० वाजता बंदी घालूनही DJ पुन्हा सुरू कसा झाला?
- काँग्रेस नेते ठाकरे यांच्या आव्हानावरही कारवाई का झाली नाही?
- जर हा अपवाद आहे, तर नियम फक्त सामान्य माणसांसाठी आहेत का?
- राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस प्रशासनाने मौन का पत्करले?
आता सर्वांच्या नजरा जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आहेत. Rajura Ganesh Visarjan कायद्याचे पालन होत नाही, तर राजकीय दबावाला शरण जाणारे प्रशासन लोकांचा विश्वास कसा टिकवणार? यावर पोलिसांकडून ठोस भूमिका येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चंद्रपूर शहरातील मंडळांना रात्री १२ वाजेपर्यंत DJ वाजवू दिले जातात, तेव्हा कुठलीही कार्यवाही होत नाही, अडवणूकही होत नाही. मग राजुरा आणि इतर तालुक्यांतच पोलीस प्रशासनाला १०.३० वाजता बंद करण्याची घाई का होते? रेतीचोरांना रात्री रस्ता मोकळा करून द्यायचा म्हणून का? — सुरज ठाकरे
कालच्या घटनेने एकच स्पष्ट केले आहे: नियम हे केवळ सर्वसामान्यांसाठी आहेत, आणि राजकीय नेत्यांसाठी अपवाद राखीव आहेत. Rajura Ganesh Visarjan लोकशाहीत असे दुटप्पी धोरण धोक्याचे ठरते. राजुरात झालेला हा प्रकार केवळ गणेश विसर्जनापुरता मर्यादित नाही, तर राज्यभरात “कायदा की राजकारण?” हा गंभीर प्रश्न निर्माण करतो.
What exactly happened during the Rajura Ganesh Visarjan on 7 September 2025?
Why is the incident controversial?
Did the police take any action against the violation?
What larger issue does this incident highlight?
#Rajura #Chandrapur #GaneshVisarjan #Ganeshotsav2025 #SurajThakre #CongressLeader #DJBan #DolbyBan #NoisePollution #LawAndOrder #SupremeCourtOrders #BombayHighCourt #PoliceAdministration #RuleOfLaw #PoliticalPressure #MidnightDJ #GaneshMandals #HindutvaPolitics #MarashtraPolitics #RajuraNews #GaneshVisarjan2025 #JusticeForCitizens #CitizenRights #Accountability #RuleVsPolitics #MaharashtraUpdates #GanpatiBappaMorya #FestivalPolitics #DolbyControversy #GanpatiVisarjanRow #SilentAdministration #PoliceInaction #PoliticalInterference #GaneshFestival2025 #RajuraControversy #NoActionTaken #MaharashtraNews #DemocracyUnderThreat #CitizenVoices #FestivalRules #NoiseBanViolation #PeopleVsPolitics #GanpatiCelebrations #CivicRights #GaneshMandir #DJViolation #GaneshDevotion #LawBroken #PublicAnger #GanpatiProcession #MahawaniNews #RajuraNews #VeerPunekarReport #SurajThakreNews #DJNews #RajuraGaneshVisarjanDJControversy