इंडस्ट्री वेंचर प्रायव्हेट लिमिटेड आणि इंटरनेशिया मार्केटिंग कंपनीविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा
Job Scam Chandrapur | चंद्रपूर | जिल्ह्यातील बाबूपेठ परिसरात सुरू असलेल्या इंडस्ट्री वेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बेरोजगार युवक-युवतींना “पूरक प्रॉडक्ट विक्री” व नोकरीच्या आमिषाने ₹४६,५०० रुपये उकळत आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. रोजगार, नियमित पगार व आकर्षक कमिशनच्या खोट्या व शाब्दिक प्रलोभनाने शेकडो युवकांना जाळ्यात ओढणाऱ्या या कंपनीने गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोणालाही पगार दिला नाही. या फसवणुकीमुळे जिल्ह्यात संतापाचा भडका उडाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
बेरोजगारीच्या फटक्याने आधीच त्रस्त असलेल्या युवकांना नोकरी आणि उत्पन्नाच्या संधी मिळत असल्याचा भास निर्माण करत या कंपनीने आधी त्यांना ‘सेल्स ट्रेनिंग’ व ‘बिझनेस पार्टनरशिप’च्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर रक्कम गोळा केली. Job Scam Chandrapur प्रत्येकी ₹४६,५०० इतकी रक्कम घेतल्यानंतर "तुम्ही आमच्या कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आहात", असा खोटा भ्रम निर्माण करण्यात आला. प्रारंभी काही दिवस प्रॉडक्ट विक्रीच्या नावाने बैठकांचे आयोजन झाले, पण त्यानंतर काहीच झाले नाही. कोणालाही पगार किंवा परतावा मिळालेला नाही.
मनसे कामगार सेनेकडे धाव – आंदेवार यांचा तत्काळ हस्तक्षेप
पीडित युवक-युवतींचा संयम सुटला तेव्हा त्यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन आंदेवार यांच्याकडे धाव घेतली. Job Scam Chandrapur त्यांनी दिलेल्या निवेदनात फसवणुकीचा संपूर्ण प्रकार उघड केला. आंदेवार यांनी तत्काळ कंपनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्याच दिवशी कंपनीचे कर्मचारी अचानक गायब झाले आणि कार्यालयावर टाळे लागले!
या प्रकाराने एकच खळबळ उडाली. मनसेच्या वतीने तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली. अमन आंदेवार यांनी या आर्थिक लुटीचा पर्दाफाश करत जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले. ही बातमी अवघ्या काही तासांत चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे, तर विदर्भभर वाऱ्यासारखी पसरली.
वर्धा जिल्ह्यातही तोच प्रकार – ‘इंटरनेशिया इंडिया मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड’चा भांडाफोड
या बातमीमुळे प्रेरित होऊन भद्रावती तालुक्यातील हनुमान आवारी, कृतिका किरटकर, वृक्षाला पोयाम आणि इतर अनेक युवक-युवतींनी अमन आंदेवार यांच्याशी संपर्क साधला. Job Scam Chandrapur त्यांनी सांगितले की, वर्ध्यातील इंटरनेशिया इंडिया मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनेही असेच आमिष दाखवून अनेक तरुणांना आर्थिक फसवणुकीचा बळी बनवले.
या माहितीनंतर आंदेवार आणि वर्धा जिल्हा मनसेचे अध्यक्ष शंकरभाऊ यांच्या नेतृत्वाखाली पीडित युवक-युवती व त्यांच्या पालकांसह कंपनीच्या वर्धा येथील कार्यालयात धडक दिली. पण तिथेही चित्र तेच – कोणतीही अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नव्हती. कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. चर्चेदरम्यान वाद विकोपाला गेला आणि हाणामारीपर्यंत मजल गेली.
मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल – प्रशासनाची भूमिका संशयास्पद
या सगळ्या प्रकारानंतर वर्धा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आले. मात्र धक्कादायक म्हणजे, कंपनीविरोधात कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवरच हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती आंदेवार यांनी दिली. Job Scam Chandrapur या प्रकरणात मनसेच्या कार्यकर्त्यांचा उद्देश कोणताही कायदा हातात घेण्याचा नव्हता, मात्र कंपनीकडून वारंवार टाळाटाळ झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली, असे स्पष्ट करीत आंदेवार यांनी जबाबदारी स्वीकारली.
ग्रामीण भागातील व अल्पवयीन मुलांचे शोषण – प्रकरण गंभीरतेचे
या प्रकरणात आणखी एक गंभीर पैलू म्हणजे, फसवणूक झालेल्या बहुतांश युवक-युवती ग्रामीण भागातील आहेत. Job Scam Chandrapur काही तर अल्पवयीन देखील असल्याचे समोर आले आहे. बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातील विश्वासाचा गैरफायदा घेत हा संपूर्ण फसवणुकीचा खेळ रचला गेला आहे. त्यामुळे हा केवळ आर्थिक लूटप्रकरण नसून तरुणांच्या भविष्यासोबत खेळ असल्याचे मनसेने ठासून सांगितले.
मनसेचा इशारा – “रस्त्यावर उतरून आंदोलन करू, न्यायाशिवाय गप्प बसणार नाही!”
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेने ठाम भूमिका घेतली आहे. Job Scam Chandrapur जिल्हाध्यक्ष अमन आंदेवार यांनी स्पष्ट इशारा दिला की, "जर बाहेरच्या राज्यातील कंपन्या महाराष्ट्रात येऊन आमच्या तरुणांची लूट करत असतील, तर आम्ही 'मनसे स्टाईल'ने रस्त्यावर उतरू. लाठी, न्यायालय, आंदोलन... जे काही लागेल ते करू. हे आंदोलन फक्त आणि फक्त न्यायासाठी असेल. तो मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही."
या फसवणुकीने शेकडो युवकांचे फक्त आर्थिक नव्हे, तर मानसिक आणि सामाजिक नुकसान केले आहे. काही पालकांनी अगदी शेती विकून, मुलांची नोकरी लागावी म्हणून पैसे भरले होते. आता त्यांना आपल्या निर्णयावर पश्चात्ताप होत आहे. युवकांचे आत्मविश्वास हरवला आहे, भविष्य अंधकारमय वाटत आहे.
सरकार, प्रशासन आणि पोलिसांची उदासीनता – फसवणुकीला खतपाणी?
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची उदासीनता आणि पोलीस यंत्रणेचा एकतर्फी दृष्टीकोन विशेषतः लक्ष वेधून घेणारा आहे. Job Scam Chandrapur गुन्हेगार मोकाट फिरत आहेत, कंपनीने टाळे मारून पळ काढले आहे आणि उलट पीडितांची बाजू घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. हा प्रकार अत्यंत चिंताजनक असून, राज्य शासनाने यात तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे.
मागण्या – कायदेशीर कारवाई, पैसे परत, आणि सतर्कता मोहिम
मनसेची स्पष्ट मागणी:
- फसवणूक करणाऱ्या कंपनीचे संचालक व प्रतिनिधींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
- पीडित युवक-युवतींना भरपाई दिली जावी व रक्कम परत मिळावी.
- अशा कंपन्यांची पार्श्वभूमी तपासून, महाराष्ट्रात बंदी घालावी.
- पोलिसांनी पीडितांची बाजू समजून घेतली पाहिजे, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील.
- जागृती अभियान राबवून युवकांना अशा फसवणुकींपासून सावध करावे.
युवकांची लूट थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत
ही फक्त एक बातमी नाही – ही महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांची हकीकत आहे. बाहेरच्या राज्यातील फसव्या कंपन्या महाराष्ट्रात येऊन "सेल्स ट्रेनिंग", "कमिशन प्लॅन", "बिझनेस अपॉर्च्युनिटी" अशा आकर्षक नावाखाली बेरोजगारांना लुटत आहेत. Job Scam Chandrapur सरकारने जर वेळीच जागं होऊन कारवाई केली नाही, तर ही आग संपूर्ण राज्यात भडकण्यास वेळ लागणार नाही.
What happened in Chandrapur related to the job scam?
Who intervened in support of the victims?
Was this an isolated scam or did it spread to other regions?
What is MNS’s stance on such frauds?
#JobScam #ChandrapurNews #YouthExploitation #FakeCompany #ManseAction #JobFraud #WorkScam #EmploymentFraud #IndiaNews #YouthJustice #ScamAlert #ChandrapurUpdates #ManseProtest #FakeJobPromise #NoSalary #JoblessYouth #EconomicFraud #WorkFromHomeScam #MarketingScam #IndiaYouth #JobCrisis #CompanyFraud #WelfareAlert #SocialJustice #VentureFraud #FraudAlertIndia #ManseFightsBack #YouthRights #BerozgarYuva #StopScams #ScamBusted #VidarbhaNews #NewsAlert #MansePower #ChandrapurExposed #JobSeekersScammed #ScamAwareness #MaharashtraPolitics #ManseSupport #ProtestForJustice #ManseLeadership #JobFraudIndia #YouthDeceived #IllegalMarketing #FraudCase #FakeFirm #YouthPower #VidhansabhaIssue #BreakingScam #DemandJustice #MarathiNews #VeerPunekarReport #MahawaniNews #Amanandhewar