मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते ३१ जुलैला पाहणीचे आश्वासन, मात्र दाखवली केराची टोपली
Jal Jeevan Mission | राजुरा | केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत सास्ती गावात सुरू करण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. जानेवारी २०२४ मध्ये सुरू झालेले हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ठेकेदार पवार कन्स्ट्रक्शन (रा. आनंदवाडी, ता. पालम, जि. परभणी) याच्या गलथान कारभारामुळे सास्ती गावातील नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.
या रखडलेल्या कामाची गंभीर दखल घेत, सास्तीचे उपसरपंच श्री. सचिन कूडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना ५ जून २०२५ रोजी पत्र लिहून काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली होती. Jal Jeevan Mission त्यानंतरही कामात कोणतीही प्रगती न झाल्यामुळे, २९ जुलै रोजी पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. या पत्रात, जर शासनाने वेळेत कारवाई केली नाही तर गावकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
२९ जुलै रोजीच जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामाबाबत मुख्य कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CO) यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान CO साहेबांनी ३१ जुलै २०२५ रोजी सास्ती गावात भेट देऊन अपूर्ण कामाची पाहणी करणार असल्याचे सांगितले. तसेच, सदर ठेकेदाराचे काम रद्द करून नवीन ठेकेदारामार्फत पुढील दोन ते तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले.
या बैठकीस गावातील ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम नळे, सुमन जंगलीवार, आनंद मांडवकर, नितेश चेतुलवार, चंदू नळे, कमलाकर शेंडे, सुनील नळे, आशिष गिरसावळे, साई ठमके, संतोष बावणे, सूरज नरड, अनिल गुंड्डेंटी, गोपाल पिंपळशेंडे, नरेश उपरे यांची उपस्थिती होती. Jal Jeevan Mission या सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने रखडलेल्या कामावर नाराजी व्यक्त केली व तात्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
जलजीवन मिशन सारख्या महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी अशा प्रकारे रखडत राहिल्यास, ग्रामीण भागातील नागरिकांचा सरकारवरचा विश्वास ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे. सास्ती ग्रामस्थांनी संयम बाळगून वेळोवेळी लेखी व तोंडी पाठपुरावा केला, तरीसुद्धा प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे, शासनाच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त होत आहे.
३१ जुलै रोजी CO साहेब गावात भेट देणार असे आश्वसन दिले होते परंतु गावकऱ्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवल्याने सास्ती गाव आंदोलनाच्या दिशेने कूच करणार हे निश्चित मानले जात आहे.
When did the Jal Jeevan Mission work begin in Sasti village?
Why is the Jal Jeevan Mission work incomplete in Sasti?
What steps have the villagers taken to address the delay?
What assurance has the administration given regarding the pending work?
#JalJeevanMission #WaterCrisis #SastiVillage #ChandrapurNews #ContractorNegligence #RuralWaterScheme #IncompleteWork #PublicProtest #ZillaParishad #PaniYojana #GovernmentSchemes #Grampanchayat #DelayedDevelopment #WaterSupplyIssue #COChandrapur #PanchayatDemand #PawarConstruction #ChandrapurDistrict #NewsUpdate #RuralIndia #CleanWater #GovernmentFailure #PublicDemand #WorkDelay #AccountabilityNow #JalMission #SastiProtest #ZPChandrapur #PaniAdhikar #IndiaRuralNews #GraminVikas #PaniPuravatha #ZPWorkIssue #InfrastructureDelay #AdministrativeNeglect #SarpanchAction #VillageNews #GroundReality #WaterSchemeFailure #CitizensVoice #GovernmentAccountability #RuralProblems #PaniYojanaDelay #AdministrativeFailure #DemandForAction #VillageDevelopment #SastiWaterIssue #LocalBodyProtest #ChandrapurUpdates #PolicyFailure #IndiaNews #RajuraNews #SastiNews #MahawaniNews #MarathiNews