एकाच दिवशी तीन मोठ्या कारवाया, लाखोंचा मुद्देमाल जप्त, गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निर्धार
Chandrapur Crime | चंद्रपूर | गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी दिनांक २९ जुलै २०२५ रोजी तब्बल तीन मोठ्या कारवाया करून शहर व ग्रामीण परिसरात खळबळ उडवून दिली. शहरातील बाबुपेठ येथे लाखो रुपयांच्या देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. दुसऱ्या घटनेत टोमटा परिसरातून वीजेच्या डॉग कंडक्टर तारांची चोरी उघडकीस आली. तिसऱ्या आक्रमक पावलात पोलिसांनी कुख्यात गुंड शारूख पठाण याला कायद्याच्या जाळ्यात अडकवून त्याच्यावर एक वर्षासाठी ‘स्थानबद्धते’चा धडाका दिला.
बाबुपेठमध्ये लाखोंच्या अवैध दारूचा साठा जप्त
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील आंबेडकर नगर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत, देशी व विदेशी दारूचे तब्बल ४९ बॉक्स, जवळपास पाच लाख रुपये किमतीचे, एकाच ठिकाणी जप्त केले. Chandrapur Crime या छाप्यात आरोपी श्रीनिवास नरहरी याच्याकडून दारू विक्रीतून मिळालेले ९७ हजार रुपये रोख, दारू वाहतुकीसाठी वापरलेले स्पीफ्ट चारचाकी वाहन (किंमत ₹५ लाख), आणि एक लोखंडी धारदार तलवारसह एकूण अंदाजे ₹१०,७४,४२०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या अवैध दारूच्या व्यापारामागे स्थानिक राजकीय वा आर्थिक साखळीदेखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Chandrapur Crime कारण शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात दारूचा साठा ठेवणे व विक्री करणे हे स्थानिक यंत्रणांना न सांगता शक्य नाही. या प्रकरणात रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ६५(ई), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा, तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोमटा परिसरात महावितरणच्या तोट्याचे वारे
उपपोलीस ठाणे धाबा हद्दीतील गोडंपिपरी – टोमटा दरम्यान ११ के.व्ही. एरिगेशन लाईनवरील ₹२१,०००/- किमतीची ३०० मीटर एल्युमिनियम डॉग कंडक्टर वायर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेत लप्पास केली. या चोरीप्रकरणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता साईनाथ लांडे यांच्या फिर्यादीवरून धाबा पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. Chandrapur Crime सदर तक्रारीच्या पुढील तपासात पोलिसांनी १) विपुल कुळमेथे, २) संदेश कोवे, ३) निलेश सातपुते यांना अटक केली असून, ४ नग वायर (₹२१,०००/-) व गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर (₹७०,०००/-) मिळून ₹९१,०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहरातील ‘दहशतवाद्याचा’ बंदोबस्त: शारूख पठाण वर ‘स्थानबद्ध’ कारवाई
शहरातील रविंद्रनगर वार्डात राहणारा, शारूख शेरखान पठाण वय २९ वर्षे, हा पोलिसांच्या गुन्हेगारी यादीतील टॉप टेन गुन्हेगारांपैकी एक मानला जात होता. Chandrapur Crime जबरी चोरी, अमली पदार्थ विक्री, विनयभंग, शिवीगाळ, दुखापत आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये अडचणीत आलेल्या या व्यक्तीविरुद्ध सुमारे ९ गुन्हे नोंद असून देखील तो कायद्याला धाब्यावर बसवून दहशत माजवत होता.
सदर इसमावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या. मात्र तो सुधारणेऐवजी अधिकच बिनधास्त गुन्हेगारी मार्गावर गेला. Chandrapur Crime त्यामुळे अखेर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी 'महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, वाळू तस्कर इ.' कायद्यान्वये जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकारी यांनी २९ जुलै रोजी स्थानबद्धतेचा आदेश पारित करून या गुंडास १ वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात डांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘गुन्हेगारीवर कायमचा लगाम हवा’
बाबुपेठ, धाबा, आणि बल्लारपूर परिसरातील नागरिकांनी या तीन कारवायांचं स्वागत केले असून अनेक नागरिकांच्या मते पोलिसांनी अशा प्रकारची सतत छापामारी व कारवाई केली पाहिजे. Chandrapur Crime दारू विक्री, अमली पदार्थ, आणि गुंडगिरी ही सामाजिक विषंवटी आहेत. याला केवळ पोलिसांनीच नव्हे तर संपूर्ण समाजानेही एकत्र येऊन विरोध केला पाहिजे.
सतत होणाऱ्या चोरी, दारू विक्री, व गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयाने ‘क्राईम मॅपिंग’ व ‘इंटेलिजन्स यंत्रणा’ सक्षम करणे आवश्यक आहे. स्थानिक गुन्हे शाखेला पुरेसे आर्थिक व तांत्रिक पाठबळ देऊन ती अधिक सक्षम केली पाहिजे. त्याचबरोबर, नागरिकांनीही पोलिसांशी समन्वय ठेवून त्यांच्या परिसरातील संशयित हालचाली, दारूविक्री केंद्रे, वा गुंड प्रवृत्ती यांची माहिती वेळोवेळी पोलीसांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे.
२९ जुलैचा दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी पोलिसी कारवायांचा 'हाय पॉइंट' ठरला. लाखोंचा मुद्देमाल, मोठे गुन्हे उघडकीस, आणि एक कुख्यात गुंड जेलमध्ये. Chandrapur Crime परंतु, हे केवळ एक पाऊल आहे—गुन्हेगारीवर पूर्ण विराम देण्यासाठी अजून शर्थीची गरज आहे.
What was recovered in the liquor raid in Babupeth, Chandrapur?
Who is Shahrukh Sherkhan Pathan and why was he detained?
What happened in the Daba police jurisdiction regarding the electricity theft?
Who led and coordinated these operations across the district?
#Chandrapur #ChandrapurNews #CrimeNews #PoliceAction #LiquorRaid #IllegalLiquor #ElectricTheft #MPDA #ShahrukhPathan #ChandrapurPolice #MaharashtraPolice #CrimeFreeChandrapur #LiquorSeizure #DesiDaroo #ForeignLiquor #SmugglingBust #IllegalTrade #PowerLineTheft #ElectricityTheft #LocalCrime #LawAndOrder #PoliceRaid #PoliceCrackdown #DreadedCriminal #GundaGiri #LawEnforcement #DistrictNews #ChandrapurDistrict #PoliceUpdates #LCBChandrapur #ProhibitionAct #CriminalDetention #LiquorMafia #AntiCrimeDrive #PublicSafety #LiquorSmuggler #ActionAgainstCrime #IllegalLiquorTrade #FIRUpdate #ChandrapurToday #PoliceConfiscation #MajorSeizure #DaruRaid #RamnagarPolice #BallarpurCrime #DabaPolice #SPChandrapur #IPSAction #IllegalLiquorSeized #PoliceEfforts #MahawaniNews #VeerPunekarReport