चंद्रपूर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची सत्यता संशयाच्या घेऱ्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष?
चंद्रपूर: महसूल विभागातील १९९६ ते २०२० या कालावधीत झालेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुय्यम सेवा महसूल अहर्ता परीक्षेला (Revenue Qualification Exam) अवैध मार्गाने बसलेल्या कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश झाला असून, हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी "प्रिया झांबरे" यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. Chandrapur Revenue Department Scam मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने हा प्रकार अधिक संशयास्पद ठरत आहे.
प्रशासनाचा हलगर्जीपणा की संगनमत?
प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. १९९६ पासून २०२० पर्यंत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे अत्यावश्यक आहे.
प्रिया झांबरे यांनी दिलेल्या तक्रारीत स्पष्ट उल्लेख आहे की, बोगस पद्धतीने महसूल पात्रता परीक्षेला बसलेले कर्मचारी सध्या महसूल विभागात सेवेत असून, या बनावट पदोन्नतीमुळे हजारो सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय झाला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने त्यांच्या मूळ पदावर परत पाठवून त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेल्या वेतनाची परतफेड शासन तिजोरीत जमा केली पाहिजे. Chandrapur Revenue Department Scam तसेच, रिक्त पदांवर नवीन भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्तांकडून उडवाउडवीची भूमिका
या तक्रारीवर विभागीय आयुक्तांनी २३ ऑक्टोबर २०२४ रोजी कारवाईचे आदेश अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात कुठलीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईसाठी सक्त आदेश देण्याऐवजी विभागीय आयुक्तांनी विनंती केली कि काय? असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पात्रातून दिसून येत आहे, हे अत्यंत लाजीरवाणे आहे. Chandrapur Revenue Department Scam त्यामुळे नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे की, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? सहा महिने उलटूनही कुठलीही चौकशी न झाल्यामुळे प्रशासनाची बेफिकिरी आणि अशक्त भूमिका स्पष्ट दिसून येते. या प्रकारावर जिल्ह्यातील बेरोजगार युवक आणि जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.
नियमबाह्य कर्मचाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न?
तक्रारीनुसार, १९९६ ते २०२० दरम्यान महसूल विभागात नियुक्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी दुय्यम सेवा महसूल अहर्ता परीक्षा बेकायदेशीर मार्गाने दिली. परंतु, अद्याप कोणताही अहवाल सादर झालेला नाही. यामुळे हे कर्मचारी खरोखरच पात्र आहेत का, याचा प्रश्न निर्माण होतो.
जर हे कर्मचारी बेकायदेशीर मार्गाने सेवेत आले असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर पडणारा भार कमी होईल आणि सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळेल. मात्र, प्रशासनाने अजूनही हा मुद्दा गांभीर्याने घेतलेला नाही.
🔹 नागरिकांच्या मागण्या:
- महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करून अपात्र कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करावे.
- १९९६ ते २०२० या कालावधीत नियुक्त कर्मचाऱ्यांची फेरतपासणी करून अनधिकृत कर्मचाऱ्यांना मूळ पदावर पाठवावे.
- अनधिकृत कर्मचाऱ्यांनी घेतलेले वेतन शासन तिजोरीत परत करावे.
- रिक्त जागांसाठी नवीन भरती प्रक्रिया राबवून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना संधी द्यावी.
- विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करावी.
⚠️ शासनाने यावर त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा!
बेरोजगारांचा संताप - आंदोलनाची चेतावणी
चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. जर लवकरच योग्य ती कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शासनाने वेळेत उपाययोजना केली नाही, तर ही बाब उच्च न्यायालयातही जाऊ शकते.
हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर असून, केवळ दुर्लक्षाने हा विषय दडपता येणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांनी बनावट पद्धतीने परीक्षा दिली, त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच, प्रशासनाने वेळ न दवडता पारदर्शक चौकशी करून सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा, अन्यथा जनआंदोलन अनिवार्य ठरेल.
What is the Chandrapur Revenue Department recruitment scam?
Who exposed the illegal recruitment in the Chandrapur Revenue Department?
What action has been taken against the fake recruitment scam?
What are the demands of the unemployed youth in this case?
#RevenueScam #ChandrapurNews #JobFraud #FakeRecruitment #EmploymentScam #Corruption #GovtJobs #IllegalRecruitment #MaharashtraNews #JobScam #GovernmentFraud #Unemployment #FakeDegrees #Bribery #PoliticalScam #EmploymentRights #JusticeForUnemployed #GovtExamScam #RecruitmentFraud #JobCheating #PublicScam #MaharashtraPolitics #YouthProtest #RecruitmentScam #RevenueFraud #ChandrapurUpdates #NagpurNews #MaharashtraCorruption #FakeExam #ExamScam #TransparencyInGovt #YouthJustice #ScamAlert #IndianBureaucracy #RTI #JobTransparency #BureaucraticCorruption #AccountabilityNow #EmploymentScandal #CorruptOfficials #ScamInvestigation #GovtExamFraud #GovtJobCheating #MaharashtraScams #YouthRights #FraudulentHiring #ExaminationScam #PublicAwareness #RecruitmentTransparency #ScamInvestigation #ChandrapurRevenueDepartmentScam