Liquor Charges | विवादित व्यंकटेश वाईनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Mahawani
0

संपूर्ण जिल्हात मद्य विक्रीमध्ये अनियमितता : अवैध शुल्क वसुलीवर कठोर पाऊल


राजुरा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल ७ नोव्हेंबर रोजी राजुरा येथील व्यंकटेश वाईन (देशी दारू दुकान) वर अवैध अतिरिक्त शुल्क आकारत असल्याबाबत अधीक्षकांच्या तपासणी दौऱ्यात कारवाई करण्यात अली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री. नितीन धार्मिक यांनी यावेळी तपासणी करून नियम भंग केल्याचे उघडकीस आणले. Liquor Charges


अधीक्षक धार्मिक यांच्या तपासणी दौरा सुरु असताना व्यंकटेश वाईन, नाका नं. ३, राजुरा येथे स्थानिक पत्रकार विर पुणेकर यांनी सहभाग घेतला. अधीक्षक धार्मिक दारू दुकानाच्या आत तपासणी करत असते वेळी काही मद्यप्रेमी मद्य खरेदी करताना अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचे विर पुणेकर यांनी अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिल्याने सदर कार्यवाही करण्यात अली परंतु याच प्रमाणे अधीक्षकांनी संपूर्ण राजूरात तपासणी केली त्या तपासणीत त्यांना मद्य विक्रीमध्ये अनियमितता आढळून आली केव्हा नाही? हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहे. 


      


व्यंकटेश वाईनसह संपूर्ण शहरातील देशी दारू, वाईन शॉप्स, आणि बिअर शॉप्समध्ये देखील अवैध अतिरिक्त शुल्क आकारण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर, कोणतेही अधिकृत बिल न देता विक्री करण्यात येत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष असून या प्रकरणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार, ग्राहकांना त्यांच्या खरेदीवर अधिकृत रसीद देणे बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारणे हे विभागाच्या कलमानुसार कायद्याचे उल्लंघन ठरते. "मद्य विक्रीमध्ये पारदर्शकता ठेवण्याची आमची प्राथमिकता असून नियमबाह्य शुल्क आकारल्यास कठोर कारवाई करण्यात येईल," असे अधीक्षक श्री. धार्मिक यांनी सांगितले. Liquor Charges


अवैध शुल्क वसुलीचा हा मुद्दा केवळ राजुरा नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील मद्य विक्री व्यवसायाला लागलेले गालबोट आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांच्या विश्वासार्हतेची जपणूक करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. पुढील काळात अशा कारवायांनी मद्य विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्याचे विभागाचे धोरण राबवले जाणे अपेक्षित आहे.


#Mahawani #veerpunekar #Chandrapur #rajura #korpana #MahawaniNews #ExciseDepartment #LiquorCharges #IllegalFees #ExciseRaid #LocalNews #PublicConcerns #ChandrapurLiquor #rajurawineshop #VenkateshWine #ExciseLaw #IllegalLiquorCharges #ConsumerRights #MaharashtraExcise #StateExcise #LiquorShops #ChandrapurNews #SocialAwareness #MaharashtraLiquor #LiquorShopInspection #IllegalPricing

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top