धडकेत विद्युत खांबा समेत सर्व विद्युत प्रवाहित तारे, डिश व इंटरनेट केबल उतरले मार्गावर
१२ मे २०२४
राजुरा/गोवरी कॉलोनी : काल रात्रो ०२:३० च्या सुमारास भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रक क्र. MH-34-BZ-6120 वे.को.ली (W.C.L) गोवरी १ शेत्रातील चेक पोस्ट समोरील मोठ्या नाल्या लगत असलेल्या वॉटर स्वीच रूम समोरील मार्गा बाजूच्या वे.को.लीच्या विद्युत खांबाला जब्बर धडक दिली. धडकेत लोखंडी खांबा समेत लगतच्या संपूर्ण खांबावरील विद्युत, डीश व इंटरनेट तारे मार्गावर उतरल्याने तब्बल २ तास वाहतूक ठप्प झाली होती. खांबावरील विद्युत प्रवाहित तारे मार्गावर पडल्याने वाहतुकीच कोंडी होत लगतच्या गोवरी कॉलोनी वासियांना तसेच वे.को.ली ला २ ते ३ तास विद्युत सेवे पासून वंचित राहावे लागले. (The truck collided with an electric pole)
सदर दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसून धडकेत ट्रकचे चांगलेच नुकसान झाले आहे. सदर ट्रक मालकाचे नाव अजून समोर आले नसून ट्रक चालक मद्य प्राशन करून वाहन चालवत असल्याचे व घटना काडोख्या रात्री झाल्याने ट्रक चालकाने पड काढल्याचे घटनास्थळी असणारे नागरिक, वाहतूक कर्ते बोलत आहे. (mahawani) (rajura) (sasti) (gowari colony) (wcl)