बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात ब्लड बँक, सोनोग्राफी सुविधा तात्काळ देण्याकरिता : वंचित बहुजन युवा आघाडीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.


मनुष्यबळ, रक्तपेढी, सोनोग्राफी सुविधा अभावी रुग्ण त्रस्त.


महावाणी - विरेंद्र पुणेकर
२० मार्च २०२४

बल्लारपूर : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज २० मार्च रोजी मा. उपविभागीय अधिकारी बल्लारपूर तसेच मा. वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर यांना बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात तात्काळ रुग्णांच्या सेवे करिता रक्तपेढी, सोनोग्राफी यंत्र तसेच अधिक मनुष्यबळ देण्या करीता निवेदन देण्यात आले. (Vanchit Bahujan Yuva Aghadi)

   बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात (Ballarpur Rural Hospital) येणारे रुग्ण हे लगतच्या खेड्यापाड्यातील गोरगरीब तसेच गंभीर आजाराचे रुग्ण असून रुग्णालयात रक्तपेढी नसल्याने आपत्कालीन वेळात रुग्णांना रक्ताच्या तुटवळ्याने तसेच रुग्णालयात गंभीर आजाराच्या रुग्णांना यंत्रणा अभावी जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येत असल्याने बहुतांश वेळी जिल्हा रुग्णालयात पोहचेपर्यंत दीर्घ आजाराच्या रुग्णाला रस्त्यातच आपला जीव गमवावा लागतो.  

        तसेच सदर रुग्णालयात सोनोग्राफी यंत्र नसल्याने रुग्णांना चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येते परंतु जिल्हा रुग्णालयात आधीच रुग्णांची मोठी गर्दी असल्यामुळे सोनोग्राफी करण्याकरिता संपूर्ण दिवस जाऊन देखील सोनोग्राफी होत नाही. याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

       बल्लारपूर तालुक्यात शेती, कोळसा खाणी, पेपर मिल, वन विभाग व जिल्ह्यातील मोठे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असल्याने बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे त्वरित रक्तपेढी व सोनोग्राफी यंत्राची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी अशी मांग अभिलाष चूनारकर तालुका अध्यक्ष बल्लारपूर वंचित बहुजन युवा आघाडी (Abhilash Chunarkar Taluka President Vanchit Bahujan Yuva Aghadi Ballarpurयांनी निवेदनातून केली आहे. या शनी सरोज झाडे, सुहास दुबे, शुभम सोनटक्के, हर्षल भसारकर, मयंक मून, अंकित अहिरवार, प्रज्योत करमनकर, आशिष निमसरकार, अभिषेक दुर्गे, सागर गेडाम व अन्य वंचित बहुजन युवा आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते. (mahawani) (chandrapur) (VBA) (SDO)

To Top