समाजात न्याय प्रस्थापित करण्यात पत्रकारांची भुमिका महत्त्वाची : आमदार सुभाष धोटे.


आमदार सुभाषभाऊ धोटे मित्रमंडळाचे वतीने पत्रकार व गुणवंतांचा सत्कार. 

महावाणी - विरेंद्र पुणेकर

०6 जानेवारी २४

राजुरा : आमदार सुभाष धोटे मित्रमंडळ, सेवा कलश फाउंडेशन व राजुरा क्लब च्या वतीने महात्मा फुले विद्यालय राजुरा येथे सुरू असलेल्या विदर्भ स्तरिय आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या भव्य विचारमंचावर पत्रकार दिनाचे औचित्य साधून राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपीपरी, कोरपना व जिवती येथील पत्रकार बांधवांचा तथा स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व्यक्तीमत्वांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे ( subhash dhote ) यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पन या वृत्तपत्राव्दारे मराठी पत्रकारीतेला जन्म दिला. तेव्हा पासून तर आजपर्यंत या क्षेत्रात झालेले अनेक बदल स्वीकारून अतिशय कठीण परिस्थितीत विविध आव्हाने झेलत पत्रकार आपले कर्तव्य बजावित आहेत. खऱ्या अर्थाने समाजात न्याय प्रस्थापित करण्यात पत्रकारांची भुमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे अशा पत्रकारांचा सत्कार आवश्यक आहे तर गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते हे देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा आधार आहेत असे मत व्यक्त केले. 

          यावेळी सत्कार सोहळ्यात राजुरा येथील प्रा. बी. यु. बोर्डेवार, अनिल बाळसराफ, गणेश बेले, आनंद चलाख, मुकरु सेलोटे, एजाज अहमद, बादल बेले, मंगेश बोरकुटे, प्रा. प्रफुल शेंडे, मंगेश बोरकुटे, वसंत पोटे, क्रिष्णा कूमार, फारुख शेख, शाहनवाज कुरेशी, साहिल सोळंके, कोरपनाचे दिपक खेकारे, गणेश लोंढे, सिध्दार्थ गोस्वामी, मनोज गोरे, जयंत जेणेकर, गोंडपीपरी चे राजु झाडे, बाळु निमगडे, सुरज माडूरवार, जिवती चे शंकर चव्हाण, दिपक साबणे, फारूक अब्दुल शेख, सलिम मोहंमद शेख इत्यादी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्पर्धा परीक्षांमधिल गुणवंतांमध्ये आकाश तावडे, शुभम पोटे, सौरभ बत्कमवार, सुजा खोब्रागडे, कुमारी सुरकर, करिश्मा उराडे तर सामाजिक कार्यकर्ते यशोदाबाई नगराळे, जिवनकला तलांडे, संगीता ठाकूर इत्यादींचा सत्कार करण्यात आला. 

       यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, अशोकराव देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, दिनकर कर्नेवार, सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एजाज अहमद यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. ( rajura ) ( mahawani ) ( The role of journalists is important in establishing justice in the society )

To Top