राजुरा तालुक्यातील बाबापूर येथे रोगाला आमंत्रण !


सरपंच व ग्रामसेवक यांच्या बेजबाबदारपणामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात

लोकवाणी- विरेंद्र पुणेकर

        बाबापूर-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम संपूर्ण भारतभर सुरू केली शहर ते गाव पातळीवर राभवण्यात येत आहे त्यामुळे काही गावांना पुरस्कार मिळाले ही आहे मात्र राजुरा तालुक्यातील येणाऱ्या बाबापूर  या गावात सद्या कार्यरत असलेल्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या ह्या बे जबाबदार व्यक्तीच्या दुर्लक्षते मुडे  पावसाळ्याच्या तोंडावर नालीची उपसा अजून पर्यन्त झाली नाही ग्राम पंचायत पुढार्यांना अजून पर्यन्त जाग आली नाही अशातच या वर्षी जगभरात कोरोना विषाणूने आपला धुमाकूळ गाजवत आहे अशाच वातावरणात गावामध्ये नाल्यांची उपसा न झाल्याने घाण युक्त निर्माण झाले आहे.

   गावातील बरेच शौचालय नालीलगत असल्याने घरगुती वापरातील सांडपाणी वाहताना दिसत आहे यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून रोगांना एक प्रकारे आमंत्रित केल्या सारखे होत आहे तरी अजून प्रर्यत  ग्राम पंचायत या कडे काना डोळा करीत आहे तसेच वित्त आयोग क्र 14 अंतर्गत गावात चौका चौकात कडेला सार्वजनिक कचरा कुंडी बांधण्यात आले परंतु बऱ्याच दिवसापासू त्या गच्च भरल्याने दुर्गंधी निर्माण झाले आहे त्यामुळे गावातील लोकांचे आरोग्य बिघडण्याची भीती निर्माण झालेली आहे या कडे ग्राम पंचायतिच्या पदाधिकाऱ्याने आपली जबाबदारी समजून सदर कामाचे निराकरण करावे अशी समस्त बाबापुर गावकऱ्या कडून मागणी होत आहे
To Top