उपविभागीय अभियांता यांना पत्रा द्वारे बांधकाम सभापती विक्रम येरणे व नगर परिषद उपाद्यस्य शरद जोगी नगर सेवक राहुल उमरे यांनी दिले निवेदन !

उपविभागीय अभियांता यांना पत्रा द्वारे    बांधकाम सभापती विक्रम येरणे  व नगर परिषद  उपाद्यस्य शरद जोगी नगर सेवक राहुल उमरे यांनी दिले निवेदन 

www.veerendrapunekar.blogspot.com
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम


उपविभागीय अभियंता
Nhai चंद्रपूर

विषय:- गडचांदूर येथील महामार्गाची निकृष्ट दर्जाची दुरुस्ती होत असल्याबाबत

महोदय,
औद्योगिक नागरी गडचांदूर येथील मुख्य रस्ता जो राजुरा- गोविंदपुर राज्य महामार्ग या नावाने अस्तित्वात होता सदर महामार्गाचे रुंदीकरण हे CRF अंतर्गत तीन वर्षापूर्वी पूर्ण झाले.
सदर काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असताना मी स्वतः याबाबत तक्रार केली होती काम संपल्यावर सदर रस्ता एक महिन्यात खराब झाला व त्यावर ठिक-ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले. तत्कालीन ठेकेदाराने दुरुस्तीच्या नावावर फक्त लिपा - पोती करीत दोष दुरुस्ती चा दोन वर्ष कालावधी चाल ढकल करीत काढला
दरम्यान सदर रस्ता हा NHAI ला हस्तांतरित झाला.
सदर हायवे रोड चे दुरुस्ती व डांबरीकरण चे काम सध्या सुरू आहे परंतु सदर काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. खडीकरण झालेले काम अवघ्या दोन-तीन दिवसात खराब झाले. त्यावर पुढे मजबुतीकरण व डांबरीकरण होणे बाकी आहे परंतु एक सामान्य नियम आहे की सर खालचा तळ मजबूत नसेल तर वरून कितीही काहीही करा रस्ता टिकत नाही, त्यामुळे हा रोड काम पूर्ण होण्याआधीच फुटणार व त्यावर पुन्हा खड्डे पडतील हे निश्चित.
 आपणास विनंती आहे की सदर कामाची त्वरित मौका चौकशी करावी तसेच पुढे होणारे हे काम NHAI च्या मानकाप्रमाणे होईल याबाबत दक्षता घ्यावी.
पुढे तर या रस्त्यावर खड्डे पडले तर याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.

धन्यवाद

आपला विश्वासू
विक्रम नामदेवराव येरणे
गट नेता काँग्रेस पक्ष
नगर परिषद गडचांदुर
To Top