राजुरा- बल्लारपूर महामार्गावर्ती जीव घेणे खाद्याचे साम्राज्य।



लोकवाणी- विरेंद्र पुणेकर
(२८ जून २०२३)

        नुकतीच पावसाला सुरवात झाली या मातीच्या सुगंधात नागरिकांचे मन फुलून आले तसेच बळीराजाला पावसाने पेरणीची हुरहुर लागली निसर्ग रम्य वातावरण पाहता मोकळा श्वास घ्यावा ही आवड राजुरातील नागरिकांना प्रत्येक पावसात होत असते परंतु बाहेर पळताच समोर निसर्गाचे दर्शन करण्या अगोदर बल्लारपूर राजुरा महामार्गावर जीव घेणे खड्डयाचे दर्शन होताच ह्या खड्यांना चुकवावे की निसर्गाचे दर्शन करावे, की प्रवास करावा हा प्रश्न राजुरा वासीयांना पडला आहे आज ह्या मार्गाची दशा पाहता काहिकानी दळण-वळणाचा मार्गच बदला आहे ह्या मार्गाने वाहतूक केल्यास जीवाला कधीही धोका होऊ शकतो अशी नागरिकांची समज बनली आहे. तसेच महामार्गा वरील वर्धा नदी पुलाचे नविनीकरण करण्या करीता नागरीकातून गेल्या २० वर्षा पासून मागणी होत आहे परंतु आज २० वर्ष होऊन ही प्रशासनाला भान नाही. प्रत्येक पावसात पुलावरील सुरक्षा खांब पाण्याचा वाढता स्तर पाहता काढावे लागतात खांब काढल्याने आजू बाजूचे रात्रीच्या वेळी दिसून येत नाही व वाहन चालकांना तो नेम ही बांधता येत नाही पुला वरती असलेल्या खांबाला रिफ्लेक्टर लावले असल्याने रात्रौ प्रकाश पडल्याने चमकतात परंतु पावसात ते खांब काढल्याने वाहतूक करणाऱ्या लहान, मोठ्या वाहनाचे अपघात नाकारू शकत नाही या अगोदर ह्या पुलावरती अपघात झाले आहे. ज्यात कित्येक तास वाहतूक ठप्प देखील झाली आहे. महामार्गावर वेळीस उपाययोजना न केल्यास अपघाताचे प्रमाण वाढु शकते यात दुमत नाही सदर मार्ग नागपूर, तेलंगाणा हैदराबादला जोडला आहे हा मार्ग सतत वाहतुकीनी गजबजलेला असतो महामार्गावर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालावे अशी मागणी नागरिकातून होत आहे.
To Top